Weight Loss Tips : फक्त एक रुल फॉलो केला आणि महिलेचं वजन 99 वरून आलं 60 किलोवर! कसा झाला बदल?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Weight loss journey : लुईसने ठरवलं की, आता या अवस्थेत राहायचं नाही. हे फक्त वजनाचं नाही, तर आरोग्य आणि जीवनशैलीचं प्रकरण आहे, हे तिला समजलं होतं. तिने कोणताही क्रॅश डाएट किंवा उपाशी राहण्याची पद्धत स्वीकारली नाही, तर एक सोपा आणि टिकाऊ मार्ग निवडला.
मुंबई : लुईस गफ जिचे वय 29 वर्ष आहे, तिची कथा सर्व लोकांसाठी प्रेरणादायी आहे. वजन वाढल्यामुळे बऱ्याच लोकांना थकलेले, लाजिरवाणे किंवा कमकुवत वाटू लागते. साउथ वेल्स, यूके येथील रहिवासी असलेल्या लुईस ही एक बिझनेस ओनर आहे आणि ऑक्टोबर 2024 मध्ये तिचं वजन 99 किलोपर्यंत पोहोचलं होतं. एका रात्री पार्टीदरम्यान तिला जाणवलं की, तिची तब्येत किती बिघडली आहे. ती एक तासापेक्षा जास्त वेळ डान्स करू शकली नाही, खूप घाम येऊ लागला आणि श्वासही लागला. परिस्थिती इतकी वाईट होती की, ती स्वतः वाकून बूटही घालू शकत नव्हती आणि मित्राला तिची मदत करावी लागली. त्या क्षणी तिला स्वतःची लाज वाटली आणि तोच क्षण तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
लुईस सांगते की, पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी तिने ठरवलं की, आता या अवस्थेत राहायचं नाही. हे फक्त वजनाचं नाही, तर आरोग्य आणि जीवनशैलीचं प्रकरण आहे, हे तिला समजलं होतं. तिने कोणताही क्रॅश डाएट किंवा उपाशी राहण्याची पद्धत स्वीकारली नाही, तर एक सोपा आणि टिकाऊ मार्ग निवडला. एका वर्षाच्या आत तिने 38 किलो वजन कमी केलं आणि आज तिचं वजन 60 किलो आहे. या संपूर्ण बदलामागील सर्वात मोठं कारण म्हणजे एक साधी डाएट फिलॉसॉफी, जिला 80/20 डाएट रूल म्हणतात.
advertisement
ठराविक कॅलरीजचं ठेवलं लक्ष्य..
लुईसने सर्वात आधी आपल्या आहाराकडे लक्ष दिलं. तिने कॅलरीज आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स समजून घेतले आणि असा प्लॅन तयार केला की, शरीराला आवश्यक पोषणही मिळेल आणि वजनही हळूहळू कमी होईल. सुरुवातीला तिने रोज सुमारे 1800 कॅलरीज घेण्याचं लक्ष्य ठेवलं आणि प्रोटीनवर विशेष लक्ष दिलं. यासोबतच तिने रोज 8000 ते 10000 पावलं चालण्याची सवय लावली. याचा परिणाम लवकरच दिसू लागला. पहिल्या तीन महिन्यांतच तिचं वजन 16 किलोने कमी झालं. तिने दारू आणि बाहेरचं जंक फूड पूर्णपणे सोडलं, ज्यामुळे शरीराला डिटॉक्स होण्याची संधी मिळाली.
advertisement
80/20 डाएट रूल केला फॉलो..
तिच्या संपूर्ण वेट लॉस जर्नीचा आधार 80/20 डाएट रूल ठरला. या नियमांनुसार 80 टक्के आहार हेल्दी आणि पोषणमूल्यांनी भरलेला असावा. जसं की फळं, भाज्या, प्रोटीन आणि होल फूड. उरलेल्या 20 टक्क्यांमध्ये कधीतरी आवडीच्या गोष्टी खाता येतात, जेणेकरून मनही खुश राहील आणि डाएट ओझं वाटणार नाही. लुईस सांगते की, याच संतुलनामुळे ती दीर्घकाळ आपले डाएट पाळू शकली. तिने स्वतःला कोणत्याही गोष्टीपासून पूर्णपणे वंचित ठेवलं नाही, तर नियंत्रणात राहणं शिकलं.
advertisement
जुने डाएट विरुद्ध नवे डाएट..
तिच्या जुन्या आहाराबद्दल बोलायचं झालं तर सकाळी किंवा दुपारी ती मोठी कॅरमेल कॉफी आणि सॉसेज सॅंडविच घेत असत. रात्रीचं जेवण बहुतेक वेळा चायनीज, इंडियन किंवा पिझ्झासारख्या टेकअवेवर आधारित असायचं. स्नॅक्समध्ये मफिन आणि चिप्स नेहमीच असायचे. आता मात्र तिचे डाएट पूर्णपणे बदलले आहे. सकाळी ती ग्रीक योगर्टसोबत फळं खाते. लंचला चिकन घेते आणि डिनरमध्ये स्टेक किंवा चिकनसोबत भाज्या असतात. स्नॅक्समध्ये आता ती डार्क चॉकलेट किंवा छोटी चॉकलेट बार घेते, तेही मर्यादित प्रमाणात.
advertisement
त्वचा आणि केसांवरही दिसला परिणाम..
जसं-जसं शरीरात ऊर्जा परत येऊ लागली, तसं लुईसने जिम जॉइन केलं आणि रोज वर्कआउट सुरू केलं. तिने रनिंगलाही आपल्या दिनचर्येत समाविष्ट केलं. याचा परिणाम केवळ वजनावरच नाही, तर संपूर्ण शरीरावर दिसून आला. ती सांगते की, आता ती आपल्या पाच वर्षांच्या मुलीसोबत न थकता खेळू शकते, आत्मविश्वासाने शॉपिंग करू शकतात आणि पार्कमधील स्लाइडवर बसतानाही कोणतीच अडचण येत नाही. लुईस म्हणते की, आता तिची त्वचा अधिक स्वच्छ आहे, केस अधिक दाट आणि चमकदार झाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला जंक फूडची क्रेविंगच होत नाही. आता तिचं शरीर आपोआप हेल्दी खाण्याची मागणी करतं. लुईस सांगते की, तिने आपल्या आयुष्याला योग्य दिशा दिल्याचा तिला अभिमान आहे आणि आज ती रोज स्वतःला अधिक हेल्दी, ऊर्जावान आणि आनंदी मानते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 11:08 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss Tips : फक्त एक रुल फॉलो केला आणि महिलेचं वजन 99 वरून आलं 60 किलोवर! कसा झाला बदल?









