Difference between Curd and Yogurt: आरोग्यासाठी चांगलं काय, दही की योगर्ट? दोघांमध्ये नेमका फरक काय ?

Last Updated:

Difference between Curd and Yogurt: अनेकांना दही आणि योगर्ट यांच्यातला फरक माहिती नसतो. जाणून घेऊयात दही आणि योगर्ट यांच्यातला नेमका फरक, ते कसे बनवले जातात आणि त्यांचे फायदे काय आहेत ते.

प्रतिकात्मक फोटो : दही आणि योगर्टमधला ‘हा’ फरक माहिती आहे का ?
प्रतिकात्मक फोटो : दही आणि योगर्टमधला ‘हा’ फरक माहिती आहे का ?
मुंबई: भारतात अनेक जण दही खातात तर काही जण योगर्ट. परदेशात योगर्ट खाण्याचं प्रमाण अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातही योगर्ट खाणाऱ्यांची संख्या वाढलीये. जेव्हा आपण बाजारातून दही विकत घ्यायला जातो तेव्हा योगर्ट हा दह्याचा प्रकार असल्याचं आपल्याला वाटतं. दही आणि योगर्ट खाणाऱ्या अनेकांना यातला फरक माहिती नाहीये.

जाणून घेऊयात दही आणि योगर्टमधला नेमका फरक आणि त्यांचे फायदे.

दही आणि योगर्ट यात नेमका फरक काय ?

दही आणि योगर्ट  हे दोन्ही पदार्थ जरी दुधापासून बनवले जात असले तरीही ते बनवण्याची पद्धत वेगळी आहे. दही है नैसर्गिक पद्धतीने तयार होतं तर योगर्टला कृत्रिम पद्धतीने तयार केलं जातं. दुधात थोडं दही टाकलं की, दही जमायला मदत होते. दह्यात असलेल्या लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियामुळे दुधातल्या प्रथिनांवर प्रक्रिया होऊन ते घट्ट होऊन दही तयार होतं. यामुळे दह्याला सुरूवातील गोड आणि मग आंबट अशी चव येते. तर योगर्ट तयार करण्यासाठी कृत्रिम घटकांचा उपयोग केला जातो. दुध गरम करून ते थंड केल्यानंतर त्यात बॅक्टेरिया कल्चर ज्याला स्टार्टर असंही म्हणतात ते घातलं जातं. याचं कृत्रिमरित्या किण्वन प्रक्रियेद्वारे (फर्मेंटेशन) होऊन योगर्ट तयार होतं. योगर्टची चव ही दह्यापेक्षा वेगळी असते. दही आणि योगर्ट या दोन्हीमुळे पचनाला मदत जरी होत असली तरीही दह्याच्या तुलनेत योगर्टमध्ये चांगले जीवाणू (Good Bacteria) जास्त असतात कारण दही हे नैसर्गिक तर योगर्ट हे कृत्रिमरित्या तयार केलं जातं. चवीचा जर विचार केला तर दही आणि योगर्टमध्ये फार फरक नाहीये. दोन्ही पदार्थ चवीला गोड असतात. आधी सांगितल्याप्रमाणे दही हे नैसर्गिकरित्या बनवलेलं असतं. त्यामुळे ते सुरूवातीला गोड असतं.मात्र त्यातील बॅक्टेरिया हे जीवंत असल्याने कालांतराने दही हे आंबट होत जातं. तर दुसरीकडे योगर्ट हे कृत्रिमरित्या बनवलेलं असल्याने त्याची चव ही स्थिर राहते. सध्या बाजारात विविध फ्लेवर्स आणि रंगाचे योगर्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याची जव वेगवेगळी असू शकते. दही नैसर्गिकरित्या तयार झाल्याने दही थोडसं सैलसर असतं तर योगर्ट जाड असतं
advertisement
Difference between Curd and Yogurt दही आणि योगर्टमधला ‘हा’ फरक माहिती आहे का

दही आणि योगर्टमध्ये जास्त फायदेशीर काय?

दह्यात असलेल्या प्रोबायोटिक्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आतडे निरोगी राहून पचनक्रिया सुधारते. पचनासाठी आवश्यक चांगल्या जीवाणूंची वाढ होते.दह्यातल्या कॅल्शियम हाडे मजबूत होतात. त्यामुळे काहीअंशी सांधेदुखीवर दही खाणं फायद्याचं ठरू शकतं.  योगर्टमध्ये प्रथिनं(प्रोटिन्स) जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी योगर्ट खाणं एक चांगला सर्वोत्तम पर्याय असू शकतो. योगर्ट खाल्ल्याने वृद्धापकाळात होणाऱ्या संधिवात आणि हाडांच्या त्रासांपासून आराम मिळू शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Difference between Curd and Yogurt: आरोग्यासाठी चांगलं काय, दही की योगर्ट? दोघांमध्ये नेमका फरक काय ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement