पालेभाजी तर व्हेज मग श्रावणात का खाऊ नये; खाल्लं तर काय होतं?

Last Updated:

श्रावण महिन्यात पालेभाज्या, दही आणि कढी यांचेही सेवन करू नये असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पण श्रावणात हे पदार्थ न खाण्यास का सांगतात असा प्रश्नही अनेकांना पडतो. तर यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्हीही कारणे आहेत.

News18
News18
नवी दिल्ली : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. मराठी पंचांगानुसार यावर्षी 5 ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे. अनेक जण श्रावण महिना पाळतात, उपवास करतात. खरं तर भगवान शंकरांच्या भक्तीसाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा असून या महिन्यात खाण्या-पिण्याची विशेष पथ्ये पाळली जातात. या महिन्यात मांसाहार टाळून कांदा-लसूण खाण्याचा आणि सात्त्विक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
याचबरोबर श्रावण महिन्यात पालेभाज्या, दही आणि कढी यांचेही सेवन करू नये असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पण श्रावणात हे पदार्थ न खाण्यास का सांगतात असा प्रश्नही अनेकांना पडतो. तर यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्हीही कारणे आहेत. श्रावण महिन्यात दही, दूध आणि पाले भाज्या का खाऊ नये, ते जाणून घेऊयात. यासंदर्भात 'आज तक'ने वृत्त दिले आहे.
advertisement
धार्मिक कारण काय आहे?
सात्त्विक अन्न खाल्ल्याने शुद्धता आणि आध्यात्मिकता वाढते, असं म्हणतात. सात्त्विक अन्न ताजे आणि हलके असते. कढी आणि भाज्या शरीरासाठी पौष्टिक नक्कीच आहेत परंतु त्या बनवण्याच्या पद्धतीमुळे त्या सात्त्विक तत्त्वांनी युक्त राहत नाहीत.
भगवान शंकराला निसर्ग आणि नैसर्गिक गोष्टी खूप आवडतात, असा दावा केला जातो. त्यामुळेच त्यांना भांगाच्या पानांपासून ते बेलाची पानं अर्पण केली जातात. दूध आणि दह्याने शिवलिंगाला अभिषेक केला जातो. अशातच तुम्ही ज्या वस्तूंसह भगवान शंकराची पूजा करतो, त्यांचे सेवन करणे चुकीचे असल्याचे पंडित सांगतात. त्यामुळे श्रावण महिन्यात पाले भाज्या, दूध, दही यांचे सेवन करू नये.
advertisement
वैज्ञानिक कारण काय आहे?
श्रावण महिन्यात पाऊस पडत असतो. या ओल्या वातावरणात आजूबाजूला जीव-जंतू, विषाणू व कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. आपल्याला माहीत आहे की दही बॅक्टेरियापासून बनते. दह्यात तामसी गुण असतात, त्यामुळे ते पावसाळ्यात खाणे टाळले जाते.
आयुर्वेदानुसार तामसी आहारामुळे (अति तिखट, मांसाहारी) आळस, सुस्ती येऊ शकते. याशिवाय दही खाल्ल्याने सर्दी, खोकला यांसारख्या समस्याही होऊ शकतात. त्यामुळे भक्तांच्या अध्यात्म अभ्यासात अडथळे येतात.
advertisement
पालेभाज्यांमध्येही कीटक असतात, त्यामुळे पानं दूषित होतात. ही पानं जनावरे खातात जे आपल्याला दूध देतात. त्यामुळे श्रावण महिन्यात दूध, पनीर, दही अशा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पालेभाजी तर व्हेज मग श्रावणात का खाऊ नये; खाल्लं तर काय होतं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement