पुरुषांना कमी उंचीच्या मुलीच जास्त का आवडतात? त्यांच्याकडे का ओढले जातात? यामागे आहे शास्त्रीय कारणं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहितीय का की समाजाच्या या मान्यतेपेक्षा रिसर्च काहीतरी वेगळंच सांगतंय? हो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य ही वाटेल. रिसर्चचं असं म्हणणं आहे की मुलांना सर्वात जास्त कमी उंचीच्या मुली आवडतात आणि त्या जास्त आकर्षीत करतात. पण असं का? यामागचं सायन्स आणि कारणं सविस्तर जाणून घेऊ.
मुंबई : अनेकदा कमी उंचीच्या मुलींना मनात शंका येते की “आपल्याला योग्य नवरा मिळेल ना? आपल्यामुळे आई-बाबा काळजीत तर नाहीत ना?” तर कधीकधी लोक किंवा समाजातील लोक अशा मुलींसाठी भीतीचं वातावरण तयार करतात आणि तुझं लग्न आता कसं होणार? उंची कमी आहे ना तुझी, मग मुलगा मिळेल का? असा प्रश्न उपस्थीत करतात.
पण तुम्हाला माहितीय का की समाजाच्या या मान्यतेपेक्षा रिसर्च काहीतरी वेगळंच सांगतंय? हो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य ही वाटेल. रिसर्चचं असं म्हणणं आहे की मुलांना सर्वात जास्त कमी उंचीच्या मुली आवडतात आणि त्या जास्त आकर्षीत करतात. पण असं का? यामागचं सायन्स आणि कारणं सविस्तर जाणून घेऊ.
1. जैविक कारण
अनेक अभ्यासात असं दिसून आलंय की मुलांना बहुतेकदा स्वतःपेक्षा कमी उंचीच्या मुली आवडतात. हे कदाचित निसर्गाने घालून दिलेलं एक पॅटर्न आहे. लहान उंचीच्या मुली पुरुषांना नाजूक, गोड आणि थोड्या प्रेमळ वाटतात.
advertisement
2. समाज आणि इतिहासाचा परिणाम
इतिहासात नेहमीच पुरुषांना ताकदवान आणि उंच दाखवलं गेलंय, तर स्त्रियांना सौम्य आणि मातृत्वाच्या भूमिकेत. त्यामुळे पुरुषांच्या मनात अजूनही कमी उंचीच्या मुलींबद्दल आपुलकी आणि आकर्षण जास्त जाणवतं.
3. मिठीतली गोडी
लहान उंचीच्या मुली मुलांच्या छातीपर्यंत येतात. त्यामुळे मिठी मारताना जोडीदाराला खास सुरक्षिततेची भावना मिळते. काही पुरुष तर सांगतात की अशा वेळी त्यांना जास्त "कनेक्शन" वाटतं.
advertisement
4. नात्यात समतोल
पुरुष आणि स्त्री यांच्यात उंचीचा थोडा फरक असेल तर नात्यात एक नैसर्गिक संतुलन येतं. पारंपरिक जोडीची भावना जास्त जुळते.
5. आकर्षकता आणि नाजूकपणा
कमी उंचीच्या मुली दिसायला नाजूक, क्यूट आणि गोंडस वाटतात. त्यांचा हा लूक अनेकदा मुलांचं लक्ष वेधून घेतो. काही मुलांना तर वाटतं की अशा मुली जास्त फिट आणि सक्रिय असतात.
advertisement
थोडक्यात सांगायचं तर, कमी उंची असणं ही अजिबात उणीव नाही. उलट रिसर्च तर सांगतो की यातच एक वेगळं आकर्षण दडलं आहे. म्हणूनच कमी उंचीच्या मुलींनो, आत्मविश्वास ठेवा… कारण तुमच्यातली हीच खासियत अनेकांच्या मनाला भुरळ घालते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 8:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पुरुषांना कमी उंचीच्या मुलीच जास्त का आवडतात? त्यांच्याकडे का ओढले जातात? यामागे आहे शास्त्रीय कारणं