फ्लिपकार्ट-ऍमेझॉनमध्ये कोण देतं खरा डिस्काउंट आणि कशावर मिळते खोटी डिल? असं करा झटपट चेक

Last Updated:

ती वस्तू विकत घेतल्यानंतर किंवा त्याचे पैसे भरल्यानंतर जेव्हा आपण तीच वस्तू दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पहातो, तेव्हा ती आपल्याला स्वस्तात दिसते. अशावेळी पश्चातापाची वेळ येते.

flipkart and amazon
flipkart and amazon
मुंबई : सध्या ऑनलाइन शॉपिंगचा सीझन जोरात सुरू आहे. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival या दोन मोठ्या सेलमध्ये ग्राहकांसाठी ऑफर्स आणि डिस्काउंट्सची भरमार आहे. इतके आकर्षक डिस्काउंट्स पाहून प्रत्येकाची इच्छा होते जास्तीत जास्त शॉपिंग करण्याची. पण प्रत्येकवेळी सगळ्या गोष्टींवर खरंच डिस्काउंट मिळतो की फक्त दाखवण्यापुरता?
अनेकदा आपण एखादी वस्तू घाईघाईत विकत घेतो कारण आपल्या मनात भीती असते की अशी डिल पुन्हा मिळणार नाही आणि जर या सेकंदाला मी ते बुक केलं नाही तर थोड्यावेळात आउट ऑफ स्टॉक होऊ शकतो. पण ती वस्तू विकत घेतल्यानंतर किंवा त्याचे पैसे भरल्यानंतर जेव्हा आपण तीच वस्तू दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पहातो, तेव्हा ती आपल्याला स्वस्तात दिसते. अशावेळी पश्चातापाची वेळ येते.
advertisement
अशा सेलमध्ये प्रत्येक साइटवर जाऊन प्राइस तपासणं शक्य नसतं. अशावेळी मनात प्रश्न येतो की काश यार मी आधी तपासलं असतं किंवा असा काहीतरी पर्याय असावा ज्यामुळे हे सगळं आधीच कळेल आणि चांगली डिल मिळेल. तुमच्या पैशांची खरी बचत करण्यासाठी एक उपाय नक्कीच आला आहे. तो म्हणजे Buyhatke.
Buyhatke म्हणजे काय?
Buyhatke हा एक Chrome Extension आहे जो तुमचा पर्सनल शॉपिंग असिस्टंट म्हणून काम करतो.
advertisement
तो तुम्हाला प्रोडक्टची प्राइस हिस्ट्री दाखवतो.
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याच प्रोडक्टची किंमत तुलना करून खरेच डिस्काउंट आहे का हे सांगतो.
प्राइस ग्राफ दाखवून वेळेनुसार किंमत कशी बदलली तेही कळतं.
भविष्यात किंमत कमी होईल का याचं प्रेडिक्शनदेखील मिळतं.
कसे डाउनलोड करायचे?
1. Google Chrome मध्ये “Buyhatke” सर्च करा.
2. Add to Chrome वर क्लिक करून एक्स्टेन्शन इन्स्टॉल करा.
advertisement
3. एकदा अॅड झाल्यावर, जेंव्हा हवे तेंव्हा वरच्या बारमधून एक्स्टेन्शन ऑन करून प्राइस डिटेल्स पाहू शकता.
Buyhatke चे खास फीचर्स
Auto Coupons: तो सर्वात बेस्ट कूपन शोधून चेकआउटवेळी आपोआप अप्लाय करतो.
Price Drop Alert: हवी असलेली वस्तू महाग वाटली तर अलर्ट सेट करा, किंमत कमी झाली की लगेच नोटिफिकेशन मिळेल.
Lookalike Feature: महाग वस्तूऐवजी त्याचा चांगला आणि स्वस्त पर्याय शोधून देतो.
advertisement
सेलमध्ये प्रोडक्ट्सच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे Buyhatke वापरल्यास तुम्ही कधीही फेक डिस्काउंटच्या जाळ्यात अडकणार नाही आणि प्रत्येक पैशाचा योग्य उपयोग होईल. या नवरात्रीच्या सेलमध्ये जर तुम्ही Flipkart किंवा Amazon वर शॉपिंग करणार असाल, तर आधी Buyhatke वापरायला करायला विसरू नका.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
फ्लिपकार्ट-ऍमेझॉनमध्ये कोण देतं खरा डिस्काउंट आणि कशावर मिळते खोटी डिल? असं करा झटपट चेक
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement