Gold Price : सोन्याचे दागिने विकले की त्याचे कमी पैसे का येतात? सोनार नक्की कुठे करतो घट?

Last Updated:

दागिने घेऊन सराफाकडे जाता, तेव्हा मनात हिशोब असतो की, "आज सोन्याचा भाव इतका आहे, म्हणजे मला 2 तोळ्याचे किमान दोन-अडीच लाख तरी मिळतीलच" पण जेव्हा सोनार ते दागिने वितळवतो आणि तुमच्या हातात जी रक्कम ठेवतो, ती पाहून तुमचा चेहरा पडतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : प्रत्येक घरात कमी-अधीक प्रमाणात सोनं असतंच, घरातील महिला ते सणासमारंभाला घालून जातात किंवा अगदीच गरज पडली तर त्याला विकतात. त्यामुळे अनेक लोक सोन्याकडे सेफ गुंतवणूक म्हणून पाहातात. आता तर तुम्ही पाहिलं असेल की सोन्याचा भाव गगनाला भिडलाय. त्यामुळे जास्त पैसे मिळतील या आशेने लोक ते विकायला सोनाराकडे जातात. तुम्ही मोठ्या आशेने ते दागिने घेऊन सराफाकडे जाता, तेव्हा मनात हिशोब असतो की, "आज सोन्याचा भाव इतका आहे, म्हणजे मला 2 तोळ्याचे किमान दोन-अडीच लाख तरी मिळतीलच" पण जेव्हा सोनार ते दागिने वितळवतो आणि तुमच्या हातात जी रक्कम ठेवतो, ती पाहून तुमचा चेहरा पडतो.
"अरे, इतकं सोनं असूनही हातात एवढे कमी पैसे कसे?" असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. आपण विचार करतो की सोनाराने आपल्याला फसवले का? पण थांबा, यामागे केवळ भाव कारणीभूत नसून सोन्याच्या गणितातील अशी काही गुपितं आहेत, जी सामान्य माणसाला सहसा माहित नसतात.
'शुद्धता' आणि 'कॅरेट'चा खेळ
आपण जे दागिने अंगावर घालतो, ते कधीच 100% शुद्ध नसतात. शक्यतो दागिने 22 कॅरेटचे असतात. याचा अर्थ असा की, जर तुमच्याकडे 10 तोळं दागिने असतील, तर त्यात केवळ 9 तोळंच शुद्ध सोनं असतं. उरलेलं वजन हे तांबे किंवा जस्तासारख्या मिश्रधातूंचं असतं, जे दागिने मजबूत करण्यासाठी वापरले जातात. जेव्हा सोनं वितळवलं जातं, तेव्हा हे मिश्रधातू बाजूला होतात आणि फक्त शुद्ध सोन्याचेच पैसे तुम्हाला मिळतात.
advertisement
वितळवताना होणारी 'ती' सूक्ष्म घट
हे कारण अनेकांसाठी नवीन असू शकतं. जेव्हा सोनं उच्च तापमानाला वितळवलं जातं, तेव्हा उष्णतेमुळे सोन्याची अत्यंत सूक्ष्म प्रमाणात 'घट' (Melting Loss) होते. जरी हे प्रमाण खूप कमी असलं, तरी अंतिम वजनावर त्याचा परिणाम होतो. तुमचं आधीचं वजन आणि वितळवल्यानंतरचं वजन यात यामुळेच फरक जाणवतो.
दागिने जोडणारी 'टाकी' (Solder)
हार, कानातले किंवा नाजूक चेन बनवण्यासाठी अनेक ठिकाणी सोन्याचे छोटे छोटे सांधे जोडलेले असतात. या जोडणीसाठी जो 'धातू' वापरला जातो, तो शुद्ध सोन्याचा नसतो. याला 'टाकी' म्हणतात. वितळवल्यानंतर या धातूची किंमत पूर्णपणे शून्य धरली जाते, ज्यामुळे तुमच्या एकूण रकमेतून मोठी कपात होते.
advertisement
खडे, कुंदन आणि मेकिंग चार्जेसचा 'धोका'
आपल्या दागिन्यांवर सुंदर खडे, मोती किंवा कुंदनचं काम असतं. घेताना आपण या सगळ्याचं वजन सोन्याच्या भावानेच मोजतो. पण विकताना सोनार हे सर्व खडे आधीच काढतो किंवा त्याचं वजन वजा करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दागिने विकताना तुम्हाला 'मेकिंग चार्जेस' (घडणावळ) चे पैसे कधीच परत मिळत नाहीत. ही रक्कम खरेदीच्या वेळी केवळ कारागिराच्या कष्टासाठी दिलेली असते.
advertisement
हॉलमार्क नसेल तर दुहेरी फटका
तुमच्या दागिन्यांवर जर हॉलमार्कचा शिक्का नसेल, तर व्यापारी त्याच्या शुद्धतेवर शंका घेऊ शकतो. अशा वेळी सोनं कितीही चांगलं असलं, तरी त्याची शुद्धता कमी धरून भाव लावला जातो. जुनं सोनं असेल तर त्यात शुद्धतेची हमी नसल्यामुळे व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी दर कमी लावतात.
फसवणूक टाळण्यासाठी 'हे' लक्षात ठेवा:
सोनं विकण्यापूर्वी दोन-तीन वेगवेगळ्या सराफांकडून त्याचे वजन आणि शुद्धता तपासा.
advertisement
शक्य असल्यास ज्या दुकानातून सोनं घेतलं, तिथेच विकायला प्राधान्य द्या.
हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची मागणी करा, जेणेकरून भविष्यात पूर्ण किंमत मिळेल.
थोडक्यात सांगायचं तर, दागिने म्हणजे केवळ 'गुंतवणूक' नसून त्यात मोडतोड, मेकिंग चार्जेस आणि अशुद्धतेचा मोठा हिस्सा असतो. त्यामुळे सोन्याच्या 'बिस्किटा'ची आणि 'दागिन्या'ची विक्री किंमत कधीच सारखी नसते. ही गुपितं लक्षात ठेवली तर पुढच्या वेळी सोनं विकताना तुम्हाला धक्का बसणार नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price : सोन्याचे दागिने विकले की त्याचे कमी पैसे का येतात? सोनार नक्की कुठे करतो घट?
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement