वेस्टन ते नॉड वनपीसची करा स्वस्तात खरेदी; पुण्यातील 'या' मार्केटमध्ये खरेदीची संधी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महिलांना नेहमीच वेगवेगळे फॅशनचे कपडे घालायला आवडतात. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे वनपीस हे पुण्यात कुठे खरेदी करू शकता याचीच माहिती तुम्हाला देणार आहोत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : शॉपिंग हा महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महिलांना नेहमीच वेगवेगळे फॅशनचे कपडे घालायला आवडतात. त्यामध्ये महिलांचा एक ठरलेला पेहराव असतो तो म्हणजे वनपीस. मग पार्टी असो किंवा बाहेर फिरायला जायचं असो अशा वेळेस महिला या वनपीसलाच पसंती देतात. हलके फुलके आणि सुंदर असे वनपीस हे एक हटके असा वेगळाच लुक देतात. त्यामुळेच वेगवेळ्या प्रकारचे वनपीस हे पुण्यात कुठे खरेदी करू शकता याचीच माहिती तुम्हाला देणार आहोत.
advertisement
कुठे कराल खरेदी?
पुण्यातील तुळशीबाग मार्केटमध्ये असलेल्या प्रेरणा कलेक्शन या दुकानात महिलांचे वेस्टन वनपीस, पार्टी वेअर वनपीस, शॉर्ट वनपीस, फुल वनपीस, थ्री फॉर बाही असलेले तसेच नॉड वनपीस असे वेगवेगळे वन पीस हे खरेदी करू शकता. याची किंमत 500 रुपयांपासून सुरु होते तर ते 2200 पर्यंत खरेदी करू शकता.
जम्मू-काश्मीरचे भरत काम केलेले कॉटन ड्रेस मटेरियल खरेदी करा पुण्यात, ग्लॅमरस लुकसाठी बेस्ट पर्याय Video
या वन पीसमध्ये तुम्हाला एक एलीगंट लुक मिळेल. तो तुम्ही ऑफिस पार्टी, प्रि व्हेडिंग, इतर पार्टी आणि बाहेर फिरायला जाताना घालू शकता. हे वनपीस अगदी स्वस्तात मस्त घेऊ शकता. या ठिकाणी मिळणारे विविध व्हरायटीचे वनपीस प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध आहेत. तर तुम्ही तुळशीबाग मार्केटमधून याची नक्कीच खरेदी करू शकता, अशी माहिती दुकानाचे व्यवस्थापक धीरज कुमार यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 18, 2024 3:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
वेस्टन ते नॉड वनपीसची करा स्वस्तात खरेदी; पुण्यातील 'या' मार्केटमध्ये खरेदीची संधी