Mumbai Crime: बाप-लेकाच्या नात्याला काळिमा! पोटच्या मुलावर विश्वास ठेवणं पडलं महाग, वडिलांच्या रूमवर घातला दरोडा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Mumbai Crime: मुंबईतल्या घाटकोपरमध्ये बाप- लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलाने वडिलांच्या रूमवर ताबा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
मुंबई: मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बाप- लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलाने वडिलांची रूमवर ताबा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वृद्ध वडिलांनी पोटच्या मुलाच्या विरोधात घाटकोपर पूर्वेतील पंतनगर पोलीस ठाण्यात आपल्या मुलाविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
पंतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतनगरमधील ९० फूट रोडवरील त्रिकाल बिल्डींगमधे राहणार्या राजेंद्र प्रताप रामजी सिंह (66) यांनी सांगितले की, ते गेल्या 45 वर्षांपासून तिथल्या घरात राहत आहेत. त्यांच्या पत्नीचं 2019 साली निधन झालं असून घरी ते एकटेच राहतात. त्यांचा मोठा मुलगा हितेश सिंग जर्मनीमध्ये राहतो, तर धाकटा मुलगा जयेश सिंग घाटकोपर (पूर्व) मध्ये त्याच्या कुटुंबासोबत राहत आहे. राजेंद्र प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 1983 साली घाटकोपरमध्ये घर खरेदी केलं होतं. ज्याचं रूपांतर त्यांनी पुढे तीन खोल्यांमध्ये केलं. त्या तीन खोल्या त्यांनी स्वतःसाठी, दुसरी त्यांच्या ऑफिससाठी आणि तिसरी राज बुक सेंटर नावाच्या दुकानासाठी.
advertisement
परंतु त्यांना त्यांच्या आजारपणामुळे 2020 पासून दुकान चालवता येत नव्हतं. आजारपणामुळे दुकानामध्ये लक्ष देणं शक्य होत नसल्यामुळे राजेंद्र सिंग यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला कामावर मदतीसाठी बोलावलं होतं. राजेंद्र सिंग यांनी त्यांच्या मुलावर दुकान व्यवस्थित चालवलं नसल्याचा आरोप केला आहे. शिवाय, इतकंच नाही तर, त्याने वडिलांच्या दुकानातील काही वस्तुही विकल्याचा त्यांनी आरोप केला आहे. 2023 मध्ये, त्यांच्या मुलाने म्हणजेच, जयेश सिंगने ते दुकान भाड्याने दिले होते. त्या दुकानाचं रूपांतर सलूनमध्ये करण्यात आलं होतं, ज्याचं भाडं जयेश 14,000 रूपये इतके घेत होता. वडिलांनी पंतनगर पोलिस ठाण्यामध्ये मुलगा जयेश सिंगच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे.
advertisement
फसवणूक झाल्याचं केव्हा उघड झालं?
घर बदलताना सापडलेल्या कागदपत्रांवरून फसवणूक झाल्याचे उघड झाले. फेब्रुवारी 2025 मध्ये जयेश सिंग घर बदलत असताना वडिलांना बनावट कागदपत्रे सापडले होते. रूमचे बनावट कागदपत्रे पाहून वडीलांना धक्का बसला होता. या कागदपत्रांमध्ये विक्री कराराच्या माध्यमातून त्रिकाल बिल्डिंगमधील खोली क्रमांक २-अ मुलगा जयेश सिंगला ती रूम हस्तांतरित केल्याचे दिसून आले. कागदपत्रांमध्ये असं नमूद केले होते की, 22 मार्च 2018 रोजी जयेशचा मेहुणा (पत्नीचा भाऊ) सुरेंद्र सिंग मुसाफिर सिंगसोबत हा व्यवहार करण्यात आला होता. जेव्हा जयेशने त्याचा मेहुणा सुरेंद्र सिंगला रूमबद्दल विचारले, तेव्हा त्याने असा कोणताही करार करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. यानंतर, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 6:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime: बाप-लेकाच्या नात्याला काळिमा! पोटच्या मुलावर विश्वास ठेवणं पडलं महाग, वडिलांच्या रूमवर घातला दरोडा








