advertisement

व्हिक्टोरिया सिक्रेट ते माय बर्बरी, फक्त 400 रुपयांपासून खरेदी करा परफ्यूम, मुंबईत हे ठिकाण माहितीये?

Last Updated:

या शॉपमध्ये सेलिब्रिटी आणि नामांकित ब्रँड्सपासून प्रेरित परफ्यूम्सचे रिक्रिएशन केवळ 400 रुपयांपासून उपलब्ध आहे. विशेष म्हणजे येथे ग्राहकांना स्वतःचा परफ्यूम कस्टमाईज करून घेण्याची सुविधा देखील दिली जाते.

+
News18

News18

मुंबई : अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम आवडतात. ओरास परफ्यूम हे दादरमध्ये सुगंधप्रेमींसाठी एक खास ठिकाण ठरत आहे. दादर वेस्टमधील स्वामी समर्थ मठाच्या गल्लीत असलेल्या या शॉपमध्ये सेलिब्रिटी आणि नामांकित ब्रँड्सपासून प्रेरित परफ्यूम्सचे रिक्रिएशन केवळ 400 रुपयांपासून उपलब्ध आहे. विशेष म्हणजे येथे ग्राहकांना स्वतःचा परफ्यूम कस्टमाईज करून घेण्याची सुविधा देखील दिली जाते.
संस्थापक सुनील सिंग यांना कॉलेजच्या काळापासून परफ्यूमची आवड होती. विविध सुगंधांचा अभ्यास करून त्यांनी स्वतः परफ्यूम तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी बनवलेले परफ्यूम मित्रांना भेट म्हणून दिले असता त्यांना त्याचा सुगंध फारच आवडला. मित्रांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांनी या आवडीला व्यवसायाचे रूप देण्याचा निर्णय घेतला आणि ओरास परफ्यूमची स्थापना झाली.
advertisement
परफ्यूम मेकिंगमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे सुगंधातील टॉप नोट्स, मिडल नोट्स आणि बेस नोट्स यांचे अचूक मिश्रण कसे करायचे याचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. येथे प्राडाच्या पॅराडॉक्स, व्हिक्टोरिया सिक्रेट, गुच्चीच्या गुच्ची रश, तसेच बर्बरीच्या माय बर्बरी यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सपासून प्रेरित सुगंध उपलब्ध आहेत, असं सुनील सिंग सांगतात.
advertisement
ज्यांना परफ्यूम व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठीही येथे मार्गदर्शन केले जाते. राष्ट्रीय किंवा खासगी संस्थांमध्ये 3 ते 4 हजार रुपयांच्या छोट्या कोर्सद्वारे परफ्यूमच्या नोट्स ओळखणे, सुगंधांची सांगड घालणे आणि स्वतःचा परफ्यूम तयार करणे शिकवले जाते. ओरास परफ्यूम कडून व्यवसायाबाबत प्राथमिक मार्गदर्शन देखील दिले जाते.
परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार आणि कस्टमाईज्ड सुगंधाचा अनुभव घ्यायचा असेल, तर दादरमधील ओरास परफ्यूमला नक्की भेट द्यावी. सुगंधाच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
व्हिक्टोरिया सिक्रेट ते माय बर्बरी, फक्त 400 रुपयांपासून खरेदी करा परफ्यूम, मुंबईत हे ठिकाण माहितीये?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement