advertisement

कौटुंबिक जबाबदारी, मग कशी करणार नोकरी? डोकं चालवलं अन् शेडमध्येच केलं पैशाचं पीक, कमाई लाखात!

Last Updated:
Mushroom Farming: विद्या उजेड यांनी पहिल्यांदा घरीच मशरूम प्लांट तयार करून पाहिलं. प्रयोग यशस्वी झाल्यावर व्यावसायिक नियोजन केलं.
1/7
सध्याच्या काळात मराठवाड्यात देखील शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. जालन्यातील अंतरवाला येथे एका गृहिणीने चक्क मशरूमची शेती केली आहे. विद्या उजेड असं या महिला शेतकऱ्याचं नाव असून त्या कौटुंबीक जबाबदारी सांभाळत ऑईस्टर मशरूम प्लांटमधून वर्षाला 5 लाखांवर कमाई करतात. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

2/7
विद्या उजेड यांनी 2015 मध्ये खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात मशरूम शेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा घरीच मशरूम प्लांट तयार करून पाहिलं. प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांनी व्यावसायिक उत्पादन घेण्याचे नियोजन केलं.

3/7
2019 मध्येच विद्या यांनी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड तयार केलं. या शेडमध्ये शेतामध्ये उपलब्ध असलेल्या धान्याच्या भुशापासून पाच किलोच्या पन्नीमध्ये बेड तयार केले. या बेडमध्ये निर्जंतुकीकरण केलेले भुसा, त्यावरती मशरूम बीज अशा पद्धतीने चार लेयर तयार करून हे बेड तरंगते लटकवून ठेवले.

4/7
या मशरुमसाठीच्या बेडमधून 22 दिवसांनी बिजांना कोंब येतो तर 25 दिवसाला मशरूमचे हार्वेस्टिंग करता येते. त्यांच्याकडे सध्या 30 बेड असून दिवसाला पाच ते सहा किलो फ्रेश मशरूम त्या तयार करतात.

5/7
तीन ते चार वेळा हार्वेस्टिंग झाल्यानंतर बेड रिकामा होतो. हा रिकामा झालेला भुशाचा बेड हा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरला जातो, असं विद्या सांगतात.

6/7
विद्या यांच्या या मशरूमला बाजारामध्ये 400 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. ड्राय मशरूमला 600 ते 1000 रुपये प्रति किलो तर मशरूम पावडरला दोन हजार रुपये प्रति किलोपर्यंत भाव आहे.

7/7
“आतापर्यंत मी इथं 180 व्यावसायिकांना मशरूम निर्मितीचे प्रशिक्षण दिलं आहे. तर तब्बल 45 मशरूम निर्मितीचे प्लांट आतापर्यंत उभे झाले आहेत”, असं विद्या उजेड यांनी सांगितलं.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement