26 की 27 फेब्रुवारी, आमलकी एकादशी नेमकी कधी? या दिवशी 'हे' एक काम कराच, भगवान विष्णू होतील प्रसन्न!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला 'आमलकी एकादशी' किंवा 'आवळा एकादशी' म्हटले जाते. या एकादशीचे महत्त्व इतर एकादशींपेक्षा अधिक आहे, कारण या दिवशी भगवान विष्णूंसोबतच आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते.
Amalaki Ekadashi 2026 : हिंदू धर्मात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला 'आमलकी एकादशी' किंवा 'आवळा एकादशी' म्हटले जाते. या एकादशीचे महत्त्व इतर एकादशींपेक्षा अधिक आहे, कारण या दिवशी भगवान विष्णूंसोबतच आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. 2026 मध्ये ही एकादशी नेमकी कधी आहे, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. चला तर मग जाणून घेऊया अचूक तारीख आणि या दिवसाचे महत्त्व.
आमलकी एकादशी 2026: अचूक तारीख आणि मुहूर्त
पंचांगानुसार, फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुरू होत असून ती 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी संपणार आहे. हिंदू धर्मात 'उदया तिथी' महत्त्वाची मानली जाते. 27 फेब्रुवारी रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्याने, शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2026 रोजी आमलकी एकादशीचे व्रत करणे शास्त्रोक्त ठरेल. एकादशी व्रताचे पारण 28 फेब्रुवारी रोजी सकाळी होईल.
advertisement
का केली जाते भगवान विष्णू आणि आवळ्याच्या झाडाची पूजा?
'आमलकी' म्हणजे आवळा. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रह्मादेवांना जन्म दिला, तेव्हा विष्णूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू सांडले आणि त्यातून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली. आवळ्याच्या झाडाच्या प्रत्येक भागात देवांचा वास असतो असे मानले जाते. मुळात विष्णू, खोडात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव वास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीला 100 राजसूय यज्ञांचे फळ मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच याला 'मोक्षदायिनी एकादशी' असेही म्हणतात.
advertisement
कोणती काम करणे ठरत शुभ?
आवळ्याच्या झाडाची पूजा: या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूंची पूजा करावी. झाडाला जल अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी.
आवळ्याचा नैवेद्य: विष्णूंना आवळा अर्पण करावा आणि स्वतःही आवळ्याचे सेवन करावे. यामुळे आरोग्य लाभते.
दानधर्म: गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा आवळ्याचे दान करणे अत्यंत फलदायी ठरते.
advertisement
विष्णू सहस्त्रनामाचे पठण: या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
पीत वस्तूंचा वापर: विष्णूंना पिवळा रंग प्रिय असल्याने पिवळी फुले, पिवळे कपडे आणि पिवळ्या अन्नाचा वापर करावा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 2:04 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
26 की 27 फेब्रुवारी, आमलकी एकादशी नेमकी कधी? या दिवशी 'हे' एक काम कराच, भगवान विष्णू होतील प्रसन्न!







