advertisement

घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहा अन् १.५० कोटी रु कमवा! हे आर्थिक गणित तुम्हाला कुणी सांगणार नाही

Last Updated:
Property Rules : घर खरेदी करणे हा प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचा मोठा स्वप्नाचा टप्पा मानला जातो.
1/6
मुंबई : घर खरेदी करणे हा प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचा मोठा स्वप्नाचा टप्पा मानला जातो. मात्र बदलत्या आर्थिक परिस्थितीत “घर घ्यायचं की भाड्याने राहायचं?” हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे. विशेषतः दरमहा ५० हजार रुपये पगार असलेल्या नोकरदारांसाठी हा निर्णय भावनिक न राहता आर्थिक गणितावर आधारित असणे गरजेचे ठरत आहे.
मुंबई : घर खरेदी करणे हा प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचा मोठा स्वप्नाचा टप्पा मानला जातो. मात्र बदलत्या आर्थिक परिस्थितीत “घर घ्यायचं की भाड्याने राहायचं?” हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे. विशेषतः दरमहा ५० हजार रुपये पगार असलेल्या नोकरदारांसाठी हा निर्णय भावनिक न राहता आर्थिक गणितावर आधारित असणे गरजेचे ठरत आहे.
advertisement
2/6
घर खरेदी की भाडे? वाढता वादआज सोशल मीडियावर घर खरेदी विरुद्ध भाड्याने राहणे यावर रोज चर्चा होत असते. काही जण घराला सुरक्षित गुंतवणूक मानतात, तर काही जण गृहकर्जामुळे येणाऱ्या आर्थिक तणावाकडे लक्ष वेधतात. प्रत्यक्षात घर खरेदी हा बहुतेकदा भावनिक निर्णय असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे निर्णय घेताना उत्पन्न, खर्च, भविष्यातील योजना आणि जोखीम यांचा विचार करणे अत्यावश्यक ठरते.
घर खरेदी की भाडे? - वाढता वाद आज सोशल मीडियावर घर खरेदी विरुद्ध भाड्याने राहणे यावर रोज चर्चा होत असते. काही जण घराला सुरक्षित गुंतवणूक मानतात, तर काही जण गृहकर्जामुळे येणाऱ्या आर्थिक तणावाकडे लक्ष वेधतात. प्रत्यक्षात घर खरेदी हा बहुतेकदा भावनिक निर्णय असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे निर्णय घेताना उत्पन्न, खर्च, भविष्यातील योजना आणि जोखीम यांचा विचार करणे अत्यावश्यक ठरते.
advertisement
3/6
५० हजार पगार, आर्थिक वास्तव काय सांगते?आजच्या घडीला ५० हजार रुपयांचा मासिक पगार मध्यम उत्पन्नात मोडतो. मात्र या उत्पन्नातून घराचा ईएमआय, दैनंदिन खर्च, बचत आणि अनपेक्षित गरजांसाठी तरतूद करणे आव्हानात्मक असू शकते. घर खरेदी करताना किमान १० ते २० टक्के डाउन पेमेंट आवश्यक असते. म्हणजेच ५० लाखांच्या घरासाठी ५ ते १० लाख रुपयांची बचत आधीच असणे गरजेचे ठरते. याशिवाय किमान सहा महिन्यांच्या पगाराइतका आपत्कालीन निधी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
५० हजार पगार, आर्थिक वास्तव काय सांगते? - आजच्या घडीला ५० हजार रुपयांचा मासिक पगार मध्यम उत्पन्नात मोडतो. मात्र या उत्पन्नातून घराचा ईएमआय, दैनंदिन खर्च, बचत आणि अनपेक्षित गरजांसाठी तरतूद करणे आव्हानात्मक असू शकते. घर खरेदी करताना किमान १० ते २० टक्के डाउन पेमेंट आवश्यक असते. म्हणजेच ५० लाखांच्या घरासाठी ५ ते १० लाख रुपयांची बचत आधीच असणे गरजेचे ठरते. याशिवाय किमान सहा महिन्यांच्या पगाराइतका आपत्कालीन निधी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
advertisement
4/6
घर खरेदीचे फायदेघर खरेदी केल्याने स्वतःचे छप्पर मिळते, ही मानसिक सुरक्षितता मोठी असते. दीर्घकाळात मालमत्तेची किंमत वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे निव्वळ संपत्तीत भर पडते. शिवाय भाड्याच्या तुलनेत गृहकर्जाचा ईएमआय अनेकदा स्थिर राहतो, त्यामुळे भविष्यातील खर्च नियोजन सुलभ होते.
घर खरेदीचे फायदे घर खरेदी केल्याने स्वतःचे छप्पर मिळते, ही मानसिक सुरक्षितता मोठी असते. दीर्घकाळात मालमत्तेची किंमत वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे निव्वळ संपत्तीत भर पडते. शिवाय भाड्याच्या तुलनेत गृहकर्जाचा ईएमआय अनेकदा स्थिर राहतो, त्यामुळे भविष्यातील खर्च नियोजन सुलभ होते.
advertisement
5/6
घर खरेदीचे तोटेगृहकर्जाचा ईएमआय पगाराच्या ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा आर्थिक नियम सांगतो. ५० हजार पगारात साधारण १५ ते २० हजारांचा ईएमआय सुरक्षित मानला जातो. मात्र महानगरांमध्ये घरांच्या किमती जास्त असल्याने ईएमआयचा भार वाढतो. शिवाय २० वर्षांच्या कर्जकाळात भरलेले एकूण व्याज कधी कधी घराच्या मूळ किमतीपेक्षाही जास्त ठरते.
घर खरेदीचे तोटे -  गृहकर्जाचा ईएमआय पगाराच्या ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा आर्थिक नियम सांगतो. ५० हजार पगारात साधारण १५ ते २० हजारांचा ईएमआय सुरक्षित मानला जातो. मात्र महानगरांमध्ये घरांच्या किमती जास्त असल्याने ईएमआयचा भार वाढतो. शिवाय २० वर्षांच्या कर्जकाळात भरलेले एकूण व्याज कधी कधी घराच्या मूळ किमतीपेक्षाही जास्त ठरते.
advertisement
6/6
उदाहरणातून काय निष्कर्ष निघतो?समजा ५० हजार पगार असलेली व्यक्ती अशा शहरात राहते, जिथे २ बीएचके घराची किंमत ४०–५० लाख आणि भाडे १५ हजार रुपये आहे. भाड्याने राहून दरमहा १५ हजारांची गुंतवणूक केल्यास २० वर्षांत सुमारे १.५० कोटी रुपयांपर्यंत निधी तयार होऊ शकतो. दुसरीकडे, घर खरेदी केल्यास २० वर्षांत ईएमआय आणि डाउन पेमेंट मिळून मोठी रक्कम खर्ची पडते.
उदाहरणातून काय निष्कर्ष निघतो? समजा ५० हजार पगार असलेली व्यक्ती अशा शहरात राहते, जिथे २ बीएचके घराची किंमत ४०–५० लाख आणि भाडे १५ हजार रुपये आहे. भाड्याने राहून दरमहा १५ हजारांची गुंतवणूक केल्यास २० वर्षांत सुमारे १.५० कोटी रुपयांपर्यंत निधी तयार होऊ शकतो. दुसरीकडे, घर खरेदी केल्यास २० वर्षांत ईएमआय आणि डाउन पेमेंट मिळून मोठी रक्कम खर्ची पडते.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement