advertisement

Grapes : द्राक्ष पाण्याने धुवून खाताय? मग खूप मोठी चुक करताय, ही आहे खाण्याची योग्य पद्धत

Last Updated:
तुमची हीच सवय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी 'महागात' पडू शकते. कारण द्राक्षांना फक्त धुणं पुरेसं नसतं.
1/9
बाजारात सध्या रसाळ आणि गोड द्राक्षांचा सिजन सुरु झाला आहे. काळी असोत वा हिरवी, द्राक्षं दिसली की आपण ती विकत घेण्याचा मोह टाळू शकत नाही. घरी आल्यावर आपण काय करतो? नळाच्या पाण्याखाली द्राक्षांचा घड धरतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. पण तुमची हीच सवय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी 'महागात' पडू शकते. कारण द्राक्षांना फक्त धुणं पुरेसं नसतं.

2/9
तुम्हाला माहित आहे का? द्राक्षांची शेतवड करताना त्यावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा (Pesticides) वापर केला जातो. ही रसायनं इतकी हट्टी असतात की केवळ साध्या पाण्याने ती निघत नाहीत. डॉ. राजकुमार (आयुष तज्ज्ञ) यांच्या मते, द्राक्षांच्या पृष्ठभागावर चिकटलेले हे रासायनिक अंश पोटात गेल्यास पचनाच्या समस्यांपासून ते दीर्घकालीन गंभीर आजारांपर्यंतचा धोका निर्माण होऊ शकतो. मग आता प्रश्न असा की ही द्राक्षं सुरक्षितपणे कशी खायची? जाणून घेऊया काही प्रभावी घरगुती उपाय.

3/9
1. साध्या पाण्याने का होत नाही सफाई?द्राक्षांवर फवारलेली कीटकनाशकं पावसाने किंवा पाण्याने वाहून जाऊ नयेत, यासाठी अनेकदा त्यात काही चिकट द्रव्ये मिसळलेली असतात. त्यामुळे तुम्ही कितीही पाणी ओतलं तरी त्यातील विषारी अंश तसेच राहतात. हे रसायन शरीरात गेल्यास ॲलर्जी, पोटदुखी किंवा उलट्या होण्याचा धोका असतो.

4/9
2. मीठ आणि पाण्याचा चमत्कारद्राक्षं स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा आणि जुना मार्ग म्हणजे मिठाचं पाणी.
कसे करावे? एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ मिसळा. या पाण्यात द्राक्षं 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवा. मीठ बॅक्टेरिया आणि कीटकनाशकांचे थर सैल करण्यास मदत करतं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने द्राक्षं पुन्हा एकदा धुवावीत.
2. मीठ आणि पाण्याचा चमत्कारद्राक्षं स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा आणि जुना मार्ग म्हणजे मिठाचं पाणी.कसे करावे? एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ मिसळा. या पाण्यात द्राक्षं 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवा. मीठ बॅक्टेरिया आणि कीटकनाशकांचे थर सैल करण्यास मदत करतं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने द्राक्षं पुन्हा एकदा धुवावीत.
advertisement
5/9
3. बेकिंग सोडा: रसायनांचा शत्रूसंशोधनानुसार, बेकिंग सोडा हा फळांवरील पेस्टिसाईड्स कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
कसे करावे? एक लिटर पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा. या द्रावणात द्राक्षं 15 मिनिटं ठेवा. त्यानंतर ताजे पाणी वापरून ती नीट धुवून घ्या.
3. बेकिंग सोडा: रसायनांचा शत्रूसंशोधनानुसार, बेकिंग सोडा हा फळांवरील पेस्टिसाईड्स कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.कसे करावे? एक लिटर पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा. या द्रावणात द्राक्षं 15 मिनिटं ठेवा. त्यानंतर ताजे पाणी वापरून ती नीट धुवून घ्या.
advertisement
6/9
4. व्हिनेगरचा (Vinegar) वापर
पांढरं व्हिनेगर कीटाणूंना मारण्यासाठी उत्तम मानलं जातं.
कसे करावे? तीन भाग पाणी आणि एक भाग व्हिनेगर असं मिश्रण तयार करा. यात द्राक्षं 10 ते 15 मिनिटं भिजवा. यामुळे द्राक्षांवरील चिकट थर पूर्णपणे निघून जातो. शेवटी साध्या पाण्याने द्राक्षं धुवा.
4. व्हिनेगरचा (Vinegar) वापरपांढरं व्हिनेगर कीटाणूंना मारण्यासाठी उत्तम मानलं जातं.कसे करावे? तीन भाग पाणी आणि एक भाग व्हिनेगर असं मिश्रण तयार करा. यात द्राक्षं 10 ते 15 मिनिटं भिजवा. यामुळे द्राक्षांवरील चिकट थर पूर्णपणे निघून जातो. शेवटी साध्या पाण्याने द्राक्षं धुवा.
advertisement
7/9
5. धुताना 'या' चुका टाळाद्राक्षं देठापासून वेगळी करण्यापूर्वीच धुवावीत, जेणेकरून रसायनं फळाच्या आत शिरणार नाहीत.
भिजवून झाल्यानंतर वाहत्या पाण्याखाली (Running Water) किमान एक-दोन मिनिटं द्राक्षं हाताने हलके चोळून धुवा.
5. धुताना 'या' चुका टाळाद्राक्षं देठापासून वेगळी करण्यापूर्वीच धुवावीत, जेणेकरून रसायनं फळाच्या आत शिरणार नाहीत.भिजवून झाल्यानंतर वाहत्या पाण्याखाली (Running Water) किमान एक-दोन मिनिटं द्राक्षं हाताने हलके चोळून धुवा.
advertisement
8/9
6. साठवण्याची योग्य पद्धतद्राक्षं धुतल्यानंतर ती लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका. ओल्या द्राक्षांना लवकर बुरशी (Fungus) लागते. त्यामुळे धुवून झाल्यावर ती सुती कापडावर किंवा टिश्यू पेपरवर पसरवून पूर्णपणे सुकवा आणि मगच हवाबंद डब्यात भरून ठेवा. यामुळे द्राक्षं जास्त काळ ताजी आणि चविष्ट राहतात.

9/9
द्राक्षं ही आरोग्यासाठी अमृतासारखी आहेत, पण ती चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास विषासारखी ठरू शकतात. त्यामुळे थोडा वेळ खर्च करून ती वरील पद्धतीने स्वच्छ करा आणि मगच त्याचा आस्वाद घ्या.
द्राक्षं ही आरोग्यासाठी अमृतासारखी आहेत, पण ती चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास विषासारखी ठरू शकतात. त्यामुळे थोडा वेळ खर्च करून ती वरील पद्धतीने स्वच्छ करा आणि मगच त्याचा आस्वाद घ्या.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement