लग्न समारंभाला खरेदीची चिंता सोडा, 500 रुपयांपासून बोरिवलीत मिळतायत भाड्याने कपडे, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना किंवा लग्न समारंभाला कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हा प्रश्न सर्वांसमोरच असतो. पारंपरिक पद्धतीचे ट्रॅडिशनल लेहंगा, घागरा चोली तसेच पुरुषांसाठी शेरवानी, डिझायनर कुर्ती आणि ब्लेझर असे सर्व प्रकारचे कपडे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना किंवा लग्न समारंभाला कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हा प्रश्न सर्वांसमोरच असतो. मात्र अनेकदा नवीन कपडे विकत घेणे शक्य होत नाही. अशातच बोरिवली मधील जैन कलेक्शन या दुकानात तुम्हाला अगदी कमी दरात भाड्याने कपडे मिळून जातील. पारंपरिक पद्धतीचे ट्रॅडिशनल लेहंगा, घागरा चोली तसेच पुरुषांसाठी शेरवानी, डिझायनर कुर्ती आणि ब्लेझर असे सर्व प्रकारचे कपडे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील.
advertisement
बोरिवली पश्चिमेला उतरल्यावर स्टेशन पासून 2 मिनिटांच्या अंतरावर जैन कलेक्शन नावाचे दुकान तुम्हाला दिसेल. या दुकानांमध्ये वेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचे कपडे तुम्ही भाड्याने वापरण्यासाठी घेऊ शकता.
advertisement
बोरिवलीच्या जैन कलेक्शन या दुकानांमध्ये जर पुरुषांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे भाड्याने घ्यायचे असतील तर त्याचे भाडे पुढीलप्रमाणे आहे. ब्लेझरमध्ये तुम्हाला 500, 700 आणि 1200 रुपये अशा तीन प्रकारचे ब्लेझर भाड्याने घेता येतील. इंडो वेस्टर्न प्रकारचे कपडे तुम्हाला 2500 पासून ते 4500 पर्यंत भाड्याने मिळून जातील. तसेच शेरवानीची किंमत ही 3500 रुपये पासून ते 8000 रुपयांपर्यंत आहे. तसेच सूटच्या भाड्याने पंधराशे पासून ते 4500 पर्यंत आहे. जोधपुरी कपड्यांची किंमत ही 2100 पासून ते 4500 पर्यंत आहे.
advertisement
महिलांसाठी जर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे हॅन्ड वर्क वेस्टर्न प्रकारचे लेहंगा पाहिजे असतील तर या दुकानात तुम्हाला 1499 पासून ते 17 ते 18 हजार रुपयांपर्यंत भाड्याने घेता येते. हळदीसाठी, रिसेप्शनसाठी किंवा इतर कोणत्या कार्यक्रमासाठी तुम्ही हेथील कपडे हमखास वापरू शकता. तसेच सध्या ट्रेंडिंग असलेले सगळेच कपडे यांच्याकडे तुम्हाला उपलब्ध होतील.
advertisement
येथे कपडे भाड्याने विकत घेण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्हाला कपडे भाड्याने विकत घेताना कपड्यांच्या तिप्पट पैसे भरावे लागतात. म्हणजे जर पंधराशे रुपयांचे कपडे तुम्ही भाड्याने घेत आहात तर तुम्हाला डिपॉझिट 3 हजार रुपये भरावे लागतात. म्हणजे एकूण तुम्हाला 4500 भरावे लागतात आणि जेव्हा तुम्ही तीन दिवसानंतर तुमचे कपडे परत देतात तेव्हा तुम्हाला तुमचे डिपॉझिट भरलेले तीन हजार रुपये परत दिले जातात आणि पंधराशे रुपये हे कपड्याचे भाडे स्वीकारले जाते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 02, 2025 10:42 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्न समारंभाला खरेदीची चिंता सोडा, 500 रुपयांपासून बोरिवलीत मिळतायत भाड्याने कपडे, Video