advertisement

Nagar Parishad Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराचा भीषण अपघात,जागीच मृत्यू,नेमकं काय घडलं?

Last Updated:

अकोल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अकोट नगरपरिषदेच्या उमेदवाराचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अलमास परवीनशेख सलीम असे या महिला उमेदवाराचे नाव होते.

ajit pawar candidate accident
ajit pawar candidate accident
Nagar Parishad Election : कुंदन जाधव,अकोला प्रतिनिधी : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराची रणधुमाळी सूरू आहे. यामध्ये राज्यातील अनेक बडे नेते,आमदार, खासदार सध्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत.या प्रचारा दरम्यान अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.अकोल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अकोट नगरपरिषदेच्या उमेदवाराचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अलमास परवीनशेख सलीम असे या महिला उमेदवाराचे नाव होते.अलमास सलीम यांच्या या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमदेवार अलमास परवीनशेख सलीम यांचा दुर्दैवी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तोंडगाव परिसरात हा अपघात घडला.या घटनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सलीम कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अकोट नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अलमास परवीनशेख सलीम यांना उमेदवारी दिली होती.त्यामुळे त्या प्रचारात व्यग्र होत्या. दरम्यान आज अलमास परवीनशेख सलीम हे खाजगी कामानिमित्त आपल्या पतींसोबत दुचाकीने जात होते. या दरम्यान त्यांच्या वाहनाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. या धडकेत अलमास परवीन शेख सलीम यांचा जागीच मृत्यू झाला होता.तर त्यांचे पती या अपघातात सुदैवाने बचावले आहे. पण त्यांना या अपघातात गंभीर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने अकोट शहरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
advertisement
दरम्यान या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
Nagar Parishad Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराचा भीषण अपघात,जागीच मृत्यू,नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement