Bhiwandi Mayor Election:भिवंडीत महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा गेम! काँग्रेसने सत्ता खेचली, भाजपला धक्का, नारायण चौधरींनी कसं मारलं मैदान?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Bhiwandi Mayor Election Election: महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षात चांगल्याच उलथापालथी आणि त्यातून काही नवीन समीकरणं जुळत असल्याचे दिसत आहे. भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे.
भिवंडी: महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षात चांगल्याच उलथापालथी आणि त्यातून काही नवीन समीकरणं जुळत असल्याचे दिसत आहे. भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली. जवळपास महिनाभर आघाडी-युतीची आकडेमोड सुरू होती. त्यातून काही नवीन समीकरणं जुळून आल्यानंतर आज मोठी घडामोड झाली. धर्मनिरपेक्ष आघाडीचे नारायण चौधरी हे भिवंडी-निजामपूर महापालिकेचे महापौर झाले आहेत.
महापौर पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेळ वाढवण्याची मागणी केली. वाहतूक कोंडी असल्याने महापौर पदाचे कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना सभागृहात यायला उशीर झाला. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी वेळ वाढवण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर एकूण १० पैकी ७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. नारायण चौधरी, स्नेहा पाटील आणि विलास पाटील हे रिंगणात राहिले.
advertisement
>> भिवंडीत महापौर पदासाठी कोणाला किती मतदान?
काँग्रेसच्या नेतृत्वातील धर्मनिरपेक्ष आघाडीचे उमेदवार नारायण चौधरी यांना ४८ मते पडली. यामध्ये काँग्रेसची ३०, भाजप फुटीरांची ६ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची १२ मते मिळाली. तर, कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना २५ मते मिळाली. भाजपच्या स्नेहा पाटील १६ मते मिळाली.
महापौरपदाच्या निवडणुकीच्या मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. भाजप, काँग्रेसने व्हीप बजावला होता. व्हीप मोडणाऱ्या नगरसेवकांवर भाजप काय कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
advertisement
भिवंडी-निजमपूर महापालिका निवडणुकीत नाट्यमय घडामोडी....
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीने अत्यंत नाट्यमय वळण घेतले.भाजपचे महापौरपदाचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना मतदान करण्यासाठी चक्क काँग्रेसने 'व्हिप' जारी केला. उपमहापौर पदी काँग्रेसचे तारिक मोमिन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. नारायण चौधरी यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह काँग्रेसच्या नेतृत्त्वातील सेक्युलर फ्रंटमध्ये प्रवेश केला. तर, दुसरीकडे महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांच्या कडून भाजपा नगरसेवकांना पक्षादेश जारी करण्यात आला. महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील तर उपमहापौर पदासाठी सुहास नकाते यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते.
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 1:15 PM IST
मराठी बातम्या/Local Body Elections/
Bhiwandi Mayor Election:भिवंडीत महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा गेम! काँग्रेसने सत्ता खेचली, भाजपला धक्का, नारायण चौधरींनी कसं मारलं मैदान?








