advertisement

Nagar Parishad Election: चिपळूणमध्ये शिवसेनेसोबत मोठा गेम,राष्ट्रवादीने डाव साधला, प्रकरण थेट निवडणूक आयोगाकडे

Last Updated:

कोकणातील चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबीटीसोबत मोठा गेम झाला आहे. महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने हा गेम केला आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Chiplun Nagar Parishad Election
Chiplun Nagar Parishad Election
Chiplun Nagar Parishad Election: राजेश जाधव, रत्नागिरी (चिपळूण) प्रतिनिधी : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.त्यामुळे सर्वच पक्ष बेंबीच्या देठापासून जोर लावतायत. अशात कोकणातील चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबीटीसोबत मोठा गेम झाला आहे. महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने हा गेम केला आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.या तक्रारीनंतर आयोग यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान नेमका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत नेमका काय गेम झाला आहे? हे जाणून घेऊयात.
नगर परिषद निवडणुकीत सर्वच पक्ष प्रचारात दंग असताना तिकडे चिपळुणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमांचा परवानगीशिवाय वापर केल्याची घटना घडली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या काही उमेदवारांकडून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत यांच्या प्रतिमांचा परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने टो गैरवापर प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज लेखी अर्ज दाखल करून तक्रार करण्यात आली आहे. तसेच या तक्रारीसह तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
शिवसेनेच्या तक्रारीतील निवेदनात काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या काही उमेदवारांकडून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत यांच्या प्रतिमांचा परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर होत असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेचे म्हणणे आहे की हे कृत्य खोडसाळ, दिशाभूल करणारे असून निवडणूक आचारसंहितेचे सरळ उल्लंघन आहे.
advertisement
याबाबत स्पष्टीकरण देताना शिवसेनेने स्पष्ट केले आहे की चिपळूण नगरपरिषद निवडणूक 2025 साठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात कोणतीही आघाडी किंवा अधिकृत युती नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. अशात काही उमेदवारांकडून शिवसेना नेत्यांचे फोटो प्रचारासाठी वापरल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा गैरवापर होऊ नये, अशी मागणी शिवसेनेने अर्जाद्वारे केली आहे.
advertisement
हा अर्ज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम यांच्या सहस्वाक्षरीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तक्रारीमुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली आहे.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
Nagar Parishad Election: चिपळूणमध्ये शिवसेनेसोबत मोठा गेम,राष्ट्रवादीने डाव साधला, प्रकरण थेट निवडणूक आयोगाकडे
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement