नात्यात I Love You नव्हे, तर 'हे' 2 शब्द ठरतात अत्यंत महत्त्वाचे! या शब्दांमुळेच नातं टिकतं आयुष्यभर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Thank You आणि Sorry हे शब्द नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा वाढवतात. या शब्दांनी नात्यातील ताण कमी होतो आणि कपल्सचे दडपण कमी होते. यामुळे नात्यात गोडवा, संवाद आणि विश्वास वाढतो, ज्यामुळे नाती आयुष्यभर टिकतात.
बहुतेक नातेसंबंध प्रेमळ सुरुवात आणि वादविवादांनी शेवट करतात. जेव्हा जोडपी त्यांच्यामध्ये अहंकार आणतात तेव्हाच वाद होतात. नातेसंबंध तुटण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आदर आणि संवाद यांचा अभाव. प्रत्येक जोडप्याने एकमेकांचे आभार मानले पाहिजेत. कारण जगात करोडो लोक आहेत. पण त्यांनी तुम्हाला आपला जोडीदार म्हणून निवडले आहे. पण अनेर जोडपी ही गोष्ट विसरतात. 'Thank You' आणि 'Sorry' या दोन शब्दांनी प्रत्येक नातं अधिक घट्ट होऊ शकतं आणि ते आयुष्यभर टिकू शकतं. या शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की, जोडप्यांना एकमेकांचा कधीच कंटाळा येणार नाही.
Thank You म्हटल्याने प्रेम वाढतं
हार्वर्ड हेल्थने 2021 मध्ये एक संशोधन केलं होतं. मानसोपचार तज्ज्ञांना असं आढळून आलं की, जे लोक आपल्या जोडीदाराचे आभार मानतात आणि प्रत्येक कामासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांचे नातेसंबंध खूप सकारात्मक असतात. अशी जोडपी एकमेकांसोबत खूप आनंदी असतात. खरं तर, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराचे आभार मानते, तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे प्रेम हार्मोन तयार होते. हे हार्मोन दोन लोकांमध्ये एक घट्ट बंध निर्माण करतं आणि अशा जोडप्यांना एकमेकांचा कधीच कंटाळा येत नाही.
advertisement
नात्यात वाढतो विश्वास
प्रत्येक नात्याचा पाया विश्वासाने सुरू होतो. हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी शब्द जादूची भूमिका बजावतात. नात्यात सॉरी म्हणणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच जोडीदाराने काही चांगलं काम केल्यास त्याचे आभार मानणंही महत्त्वाचं आहे. हे शब्द ऐकायला खूप सामान्य वाटू शकतात. पण ते नात्यात मनापासून बोलणं महत्त्वाचं आहे. जेव्हा जोडप्यांमध्ये विश्वास निर्माण होतो, तेव्हा त्यांचे नाते आयुष्यभर टिकू शकतं.
advertisement
Thank You आणि Sorry या शब्दांनी नाते सुधारतात
नातेसंबंध तज्ज्ञ डॉ. गीतांजली शर्मा सांगतात की, कोणतेही नाते परिपूर्ण नसतं. प्रत्येक जोडप्यात भांडणं आणि गैरसमज होतात. कारण दोन्ही लोकांमध्ये काहीतरी कमतरता असतात. कमतरता लवकर दूर करता येत नाहीत आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर नातं तोडताही येत नाही, त्यामुळे सॉरी आणि थँक्यू म्हणणं अधिक महत्त्वाचं ठरतं. हे शब्द नातं सांधतात आणि ते सुधारतात. सॉरी बोलल्याने, ती व्यक्ती पुन्हा ती चूक करत नाही आणि थँक्यू ऐकून, जोडीदार अधिक चांगला बनण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
'आय लव्ह यू' पेक्षा हे शब्द अधिक शक्तिशाली
बहुतेक लोकांना वाटतं की 'आय लव्ह यू' बोलल्याने नातं घट्ट होतं. पण प्रेम या शब्दांनी व्यक्त होत नाही. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुम्ही त्याच्यासाठी काहीही करू शकता. कधीकधी तुमची चूक नसतानाही तुम्ही सॉरी म्हणू शकता आणि विनाकारण थँक्यू देखील म्हणू शकता. 'आय लव्ह यू' म्हणण्याऐवजी, जर एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराला 'माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि विश्वास ठेवल्याबद्दल Thank You असं म्हणेल, तर या वाक्याचा 'आय लव्ह यू' पेक्षा जास्त परिणाम होईल. जोडीदाराचे आभार मानणे, चांगल्या कामासाठी त्याची प्रशंसा करणे आणि चुकीसाठी सॉरी बोलल्याने नातं अधिक मजबूत होतं.
advertisement
तणाव होतो दूर
जर पती-पत्नीचे नाते चांगले नसेल, तर बहुतेक लोक नैराश्याचे बळी ठरतात. पण नातं का बिघडतं, यावर कोणी विचार करत नाही. प्रत्येक नातं समर्पण, साथ, विश्वास, आदर आणि नम्रतेनेच गोड होऊ शकतं. पण आजकाल बहुतेक जोडप्यांना नम्र व्हायचं नसतं. आदर मिळवण्यासाठी, आदर करावा लागतो. अशा स्थितीत, जर सॉरी आणि थँक्यू सारखे शब्द बोलले गेले, तर नातं सुधारू शकतं, पण फक्त एकाच जोडीदाराने हे नेहमी करणंही योग्य नाही. दोघांनीही हे शब्द त्यांच्या नात्यात समाविष्ट केले पाहिजेत. जर नात्यात गोडवा असेल, तर व्यक्तीला तणाव किंवा नैराश्य येत नाही. कारण त्याच्याकडे आपल्या भावना शेअर करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी एक चांगला जोडीदार असतो.
advertisement
संवादात अंतर नसतं
सॉरी आणि थँक्यू सारखे शब्द जोडप्यांमधील सर्व मतभेद दूर करतात. हे शब्द मनातली कटुता दूर करतात आणि त्यांच्यात एक चांगली समज विकसित होते. अनेकदा भांडणानंतर जोडपी एकमेकांशी बोलणं बंद करतात आणि त्यांची ही चूक त्यांच्यातील संवादाच्या अंतराचे कारण बनते. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्याच्याशी बोलणं कधीही बंद करू नये. नात्यात 'मी' बाजूला ठेवून नेहमी 'आपण'चा विचार करावा.
advertisement
जिव्हाळा चांगला राहतो
नात्यात जिव्हाळा चांगला असतो. जेव्हा जोडपी एकमेकांची माफी मागतात किंवा थँक्यू म्हणतात, तेव्हा दोन्ही शब्द दर्शवतात की जोडीदार तुमची किती काळजी घेतो. ही काळजी त्यांचं प्रेम आहे आणि ती नात्यात एक चांगली गुंतवणूकही आहे. जे जोडपे एकमेकांची काळजी घेतात ते केवळ भावनिकच नव्हे, तर शारीरिकदृष्ट्याही एकमेकांच्या जवळ असतात. म्हणजेच सॉरी आणि थँक्समुळे जोडप्यांमधील जिव्हाळाही वाढतो.
जर बोलू शकत नसाल, तर इतर मार्ग वापर
काही लोक आपल्या भावना उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत, त्यामुळे जोडप्यांमध्ये संवादाचा अभाव असतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सॉरी किंवा थँक्यू बोलू शकत नसाल, तर त्यांना लिहून तुमच्या भावना व्यक्त करा आणि तुमच्या भावना त्यांना सांगा. त्यांना भेटवस्तू आणि ग्रीटिंग कार्ड पाठवा, तुम्ही मोबाईलवर मेसेज लिहू शकता, फ्रिज किंवा भिंतीवर एक नोट लावू शकता, मुलांद्वारे तुमच्या जोडीदाराला तुमच्या मनात काय आहे ते सांगा, तुमच्या जोडीदाराचे आवडते जेवण बनवा आणि त्याला सॉरी किंवा थँक्यू नोटने सजवा. अगदी लहान कृतीही जोडीदाराला थँक्यू आणि सॉरी पोहोचवू शकतात.
हे ही वाचा : Explainer : वेगाने वितळत आहेत भारताचे ‘ग्लेशियर’, म्हणून हवामानात होतोय बदल, शेतीवर होतोय परिणाम
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 06, 2025 7:14 PM IST
मराठी बातम्या/लव स्टोरी/
नात्यात I Love You नव्हे, तर 'हे' 2 शब्द ठरतात अत्यंत महत्त्वाचे! या शब्दांमुळेच नातं टिकतं आयुष्यभर


