advertisement

Nagpur: सगळं प्लॅनिंगने चाललं होतं! शिक्षक Whats App ग्रुपवर उत्तरं पाठवायची आणि.., बारावीच्या परिक्षेतला धक्कायक प्रकार समोर

Last Updated:

तपासणी केली असता तिच्याकडे मोबाईल सापडला. त्या मोबाईलमध्ये ‘XII’ नावाचा २१ सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आढळला.

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर :  विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या दहावी आणि १२ ची परीक्षा राज्यात सुरू आहे. आपला विद्यार्थी चांगल्या मार्काने पास व्हावा यासाठी शिक्षकांनी सगळी तयार करून घेतली आहे. पण, नागपूरमध्ये एका खासगी कोचिंग क्लासच्या मास्तराचा कॉपीबाज चेहरा समोर आला आहे. खासगी क्लासमधील या शिक्षक आणि इतर टोळीने १२ ची पेपर फोडला आणि पोरांना व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला. एवढंच नाहीतर केमिस्ट्री आणि फिजिक्सनंतर आता गणिताचाही पेपर फुटला असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश मात्र एका सतर्क शिक्षिकेमुळे झाला.
advertisement
नागपुरात बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्सनंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याचं तांत्रिक तपासातून स्पष्ट झालं आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका उत्तरांसह व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आतापर्यंत एका अल्पवयीन आरोपीसह सात आरोपींना अटक झाली असून 8 व्या आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
नागपूरच्या सेंट उर्मूला परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एक विद्यार्थिनी वॉशरूममध्ये गेल्यानंतर १५ मिनिटं परत न आल्याने पर्यवेक्षक शिक्षिकेला संशय आला. तपासणी केली असता तिच्याकडे मोबाईल सापडला. त्या मोबाईलमध्ये ‘XII’ नावाचा २१ सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आढळला.
तपासात समोर आलं की, सकाळी १०.३७ वाजताच केमिस्ट्रीचा पेपर उत्तरांसह या ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता, तर प्रत्यक्ष परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार होती, म्हणजे पेपर आधीच व्हायरल झाला होता.यानंतर पोलिसांनी जप्त मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर केला आणि त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली. गणिताचाही पेपर फुटल्याचं तांत्रिक तपासात निष्पन्न झालं आहे.
advertisement
कोण कोण होतं ग्रुपमध्ये? 
- २१ सदस्यांचा ‘XII’ व्हॉट्सअप ग्रुप
- परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर व्हायरल
- मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर
- गणिताचाही पेपर फुटल्याचं उघड
- 4 वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रूप मधून प्रश्न पत्रिका आल्याचं तपासात निष्पन्न
- 4 ही ग्रूप मिळून सुमारे 50 पेक्षा अधिक लोक या ग्रुपमध्ये
- ग्रूपमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा देखील समावेश
advertisement
कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक
या प्रकरणात कोचिंग क्लास शिक्षक निशिकांत मुन, एक्सलेंट कोचिंग क्लासचे संचालक मुस्तफा खान, जुनेद मोहम्मद, दिनेश कोटांगले यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. आठव्या आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये एका सरकारी शाळेतील शिक्षकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे, अशी माहिती नागपूर विभाग माध्यमिक सचिव डॉ. शिवलिंग पटवे यांनी दिली.
advertisement
कोणत्या शाळेत सापडला प्रकार? 
निशिकांत मून हा शिकवणी वर्ग चालवत होता तर फरहान हा तिथे शिक्षक म्हणून काम करीत होता. सिव्हिल लाइन्स येथील सेंट उर्मूला हायस्कूल परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघड झाला. रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान विद्यार्थिनीच्या झडतीत स्मार्टफोन सापडला. व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आमि उत्तरं अपलोड केली होती. यासाठी ‘एक्सआयआय’ नावाच्या २१ सदस्यीय ग्रुप तयार करण्यात आला होता. मोबाईलमध्ये १६ फेब्रुवारीचा भौतिकशास्त्र पेपरही आढळला होता.
advertisement
नागपुरातील या पेपरफुटी प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य सूत्रधार हाती लागल्यानंतरच या संपूर्ण रॅकेटचा पूर्ण उलगडा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur: सगळं प्लॅनिंगने चाललं होतं! शिक्षक Whats App ग्रुपवर उत्तरं पाठवायची आणि.., बारावीच्या परिक्षेतला धक्कायक प्रकार समोर
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement