1700 किमी अंतर 13 दिवसांमध्ये पार; मुख्यधापक सरांचा छ. संभाजीनगर ते श्रीलंका अफलातून सायकलने प्रवास

Last Updated:

माणसाला एखाद्या गोष्टीची आवड असली तर ती त्याला जपता आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला वेळ देखील काढता आला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करून छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्याध्यापक सुधाकर पवार यांनी आपली आवड निवड जपली आहे.

+
‎मुख्याध्यापकाने‎ title=‎मुख्याध्यापकाने केली छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका सायकलिंग
‎ />

‎मुख्याध्यापकाने केली छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका सायकलिंग

छत्रपती संभाजीनगर: माणसाला एखाद्या गोष्टीची आवड असली तर ती त्याला जपता आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला वेळ देखील काढता आला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करून छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्याध्यापक सुधाकर पवार यांनी छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका असा 1700 किलोमीटर पर्यंतचा प्रवास सायकलवर फक्त 13 दिवसांमध्ये पूर्ण केलेला आहे.
‎सुधाकर पवार हे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. पद्मसिंह पाटील विद्यालयात मुख्यध्यापक आहेत. 2018 पासून ते सायकलिंग करत आहेत. त्यांना त्यांच्या मित्राकडून याची प्रेरणा मिळाली. सुरूवातीला त्यांनी फक्त शहरामध्ये सायकलिंग केली त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आसपासच्या तालुक्यामध्ये जाऊन सायकलिंग करायला सुरुवात केली. जेव्हा त्यांना आत्मविश्वास आला की आपण आता मोठा पल्ला देखील सायकलिंगच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. त्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा संभाजीनगर पुणे असा प्रवास सायकलवर केला.
advertisement
यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर सायकलिंग करत प्रवास करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी दिल्ली, अयोध्या, कोलकत्ता पाँडिचेरी अशा विविध ठिकाणी त्यांनी सायकलवरती प्रवास केला. त्यानंतर त्यांनी सगळ्यात लांबचा प्रवास तू केला संभाजीनगर ते नेपाळ असा. आणि त्यांनी आता संभाजीनगर ते श्रीलंका असा सतराशे किलोमीटरचा पल्ला सायकलवरती पार केला आहे, यासाठी त्यांना 13 दिवस एवढा कालावधी लागला. 15 ऑक्टोबरला त्यांनी हा प्रवास सुरू केला आणि 27 ऑक्टोबर रोजी ते श्रीलंका या ठिकाणी पोचले. यासाठी त्यांना तब्बल तेरा दिवस लागले आणि 70 ते 75 हजारापर्यंतचा खर्च यासाठी लागला असल्याची माहिती सुधाकर पवार यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
1700 किमी अंतर 13 दिवसांमध्ये पार; मुख्यधापक सरांचा छ. संभाजीनगर ते श्रीलंका अफलातून सायकलने प्रवास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement