Train Cancelled update: 23 ते 26 नोव्हेंबर तारीख नोट करून घ्या! गोंदिया, नागपूरसह 21 ट्रेन रद्द, पाहा संपूर्ण List
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोंगरगड विभागातील नॉन-इंटरलॉकिंग अपग्रेडमुळे 23-26 डिसेंबर 2025 दरम्यान रायपूर व नागपूर विभागातील 21 गाड्या रद्द. प्रवाशांनी प्रवासापूर्वी यादी तपासावी.
ख्रिसमससाठीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत त्यामुळे तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जर बाहेर पडत असाल तर त्याआधी वेळापत्रक पाहून नक्की घराबाहेर पडा. याचं कारण म्हणजे अनेक ठिकाणी एक्स्प्रेस रिशेड्युल करण्यात आल्या आहेत. काही हॉलिडे स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे.
नागपूर विभागातील डोंगरगड विभागातील अप लाईनच्या अतिरिक्त लूप लाईनवर नॉन-इंटरलॉकिंग अपग्रेडचे काम 23 ते 26 डिसेंबर 2025 पर्यंत केले जाईल. या काळात, काम सुरक्षित आणि योग्यरित्या पूर्ण व्हावे यासाठी अनेक गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या जात आहेत. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार रायपूर विभागातील 11 आणि नागपूर विभागातील 10 गाड्या प्रभावित होतील. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या योजनांमध्ये बदल करावा आणि पर्यायी व्यवस्था करावी. अनपेक्षित गैरसोय टाळण्यासाठी प्रवास करण्यापूर्वी कृपया संपूर्ण यादी तपासा.
advertisement
रेल्वेने म्हटले आहे की डोंगरगड विभागातील नॉन-इंटरलॉकिंग अपग्रेडचे काम 23 ते 26 डिसेंबर 2025 केले जाईल. या चार दिवसांत अनेक गाड्या रद्द केल्या जातील. रायपूर विभागातील 11 आणि नागपूर विभागातील 10 गाड्या प्रभावित होतील. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या योजनांमध्ये बदल करावेत त्यासाठी रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
रद्द केलेल्या गाड्यांची यादी
गाडी क्रमांक 68741 दुर्ग-गोंदिया मेमू 27 डिसेंबर रोजी रद्द करण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 68743 गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू 27 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68744 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू 27 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68742 गोंदिया-दुर्ग मेमू २7 डिसेंबर रोजी रद्द करण्यात येणार आहे.
advertisement
गाडी क्रमांक 68709 रायपूर-डोंगरगड मेमू 27 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68711 डोंगरगड-रायपूर मेमू 28 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68713 गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू 28 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68714 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-बालाघाट मेमू रद्द करण्यात येणार आहे. 28 डिसेंबर रोजी.
advertisement
गाडी क्रमांक 68715 बालाघाट-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू 28 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68716 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू 28 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68712 गोंदिया-डोंगरगड मेमू 28 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68710 डोंगरगड-रायपूर मेमू 29 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
advertisement
गाडी क्रमांक 68729 रायपूर-डोंगरगड मेमू 27 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68730 डोंगरगड-रायपूर मेमू 28 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68861गोंदिया-झारसुगुडा मेमू 26 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 68862 झारसुगुडा-गोंदिया मेमू 27 डिसेंबर रोजी रद्द केली जाईल.
गाडी क्रमांक 58205 रायपूर-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी पॅसेंजर 27 डिसेंबर रोजी रद्द करण्यात येईल.
advertisement
गाडी क्रमांक 58206 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रायपूर पॅसेंजर 28 डिसेंबर रोजी रद्द करण्यात येईल.
गाडी क्रमांक 68721 रायपूर-डोंगरगड मेमू 27 डिसेंबर रोजी रद्द करण्यात येईल.
गाडी क्रमांक 68723 डोंगरगड-गोंदिया मेमू 27 डिसेंबर रोजी रद्द करण्यात येईल.
गाडी क्रमांक 68724 गोंदिया-रायपूर मेमू 28 डिसेंबर रोजी रद्द करण्यात येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 10:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Train Cancelled update: 23 ते 26 नोव्हेंबर तारीख नोट करून घ्या! गोंदिया, नागपूरसह 21 ट्रेन रद्द, पाहा संपूर्ण List











