'जगण्याने छळलं होतं...' ना पाणी, ना उपचार, रुग्णालयातच 3 भिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, अहिल्यानगरमधील घटना
- Published by:sachin Salve
- Reported by:Sahebrao Kokane
Last Updated:
काही सामाजिक संघटना त्याठिकाणी गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यामध्ये तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
अहिल्यानगर: 'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' सुरेश भटांच्या या कवितेप्रमाणे एक मन हेलावून टाकणारी घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. रस्त्यावर भिक मागून पोट भरणाऱ्या भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन खुले कारागृहात पाठवले. पण तिथे त्यांची तब्येत खालावली तिथून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं पण तिथे ३ जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनं भिकाऱ्यांच्या कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.
शिर्डी परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्यामुळे भिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची मोहिम पोलिसांनी राबवली होती. अहिल्यानगरमध्ये रामनवमीच्या निमित्ताने शिर्डीमधून सहा भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना खुले कारागृह इथं पाठवण्यात आलं होतं. त्यातील काही भिकाऱ्यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार न होता त्यांना एका खोलीमध्ये बांधून ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे.
advertisement
काही सामाजिक संघटना त्याठिकाणी गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यामध्ये तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोपही एका वृत्ताच्या नातेवाईकांनी केला आहे.
रुग्णालयातच खोलीत बांधून ठेवलं
या सर्व भिकाऱ्यांना शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना विसापूर येथील खुल्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्या ठिकाणीही त्यांना मारहाण झाली त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर उपचार होणे गरजेचं होतं. पण उपचार झाले नाही. एका खोलीमध्ये बांधून ठेवलं होतं. एवढंच नाहीतर साधं पाणीही दिलं नाही असा आरोप एका भिकाऱ्यांनी केला आहे.
advertisement
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सिव्हिल सर्जन यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून जो कुणी दोषी असेल त्याला सोडणार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असं शासकीय सर्जन नागोराव चव्हाण यांनी केली.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
April 08, 2025 5:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'जगण्याने छळलं होतं...' ना पाणी, ना उपचार, रुग्णालयातच 3 भिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, अहिल्यानगरमधील घटना