प्रवास करताना काळजी घ्या! रक्षाबंधनाला भावा-बहिणींना पाऊस भिजवणार, विदर्भासह 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट

Last Updated:

आज रक्षाबंधनाच्या दिवशी राज्यात पावसाचा इशारा आहे. कोकणात रत्नागिरीत मुसळधार पाऊस, मुंबईत हलका ते मध्यम पाऊस, विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती.

News18
News18
आज रक्षाबंधन, बहीण भावाच्या नात्याचा गोड दिवस, भावाने बहिणीकडे जाऊन राखी बांधून घेण्याचा दिवस, बहिणीचं रक्षण करण्यासाठी दिला वचन देण्याचा दिवस, मात्र आजकाल भावाला शक्य नसेल तर बहिणी देखील भावाच्या घरी जातात. या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडण्याआधी आजचं हवामान समजून घ्या, नाहीतर धो-धो पावसामुळे तुम्ही वाटेत अडकण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाने पुन्हा एकदा उसंत घेतली आहे. कोकणात मुसळधार पाऊस गायब झाला असून सध्या उष्णता वाढत आहे. रत्नागिरी वगळता उर्वरित कोकणात रिमझिम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये 40 किमी वेगानं वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला. मुंबई, उपनगर, ठाण्यात रात्री उशिरा पाऊस होऊन गेल्यानं वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला.
advertisement
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरीला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
अहिल्यानगर, घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशीव, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळमध्ये आज वादळी वाऱ्यासह, अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल. 40-50 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
विदर्भात पुढचे चारही दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पाऊस थोडी उसंत घेईल. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे सरासरी यंदा चांगला पाऊस राहण्याची शक्यता होती. मात्र जून-जुलैच्या तुलनेतही ऑगस्ट महिन्या कमीच पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रवास करताना काळजी घ्या! रक्षाबंधनाला भावा-बहिणींना पाऊस भिजवणार, विदर्भासह 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement