Ahilya Nagar: नगर हादरलं! काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करुन मारहाण, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
Ahilya Nagar News : पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला आरोप–प्रत्यारोपाचा सिलसिला आता प्रत्यक्ष हिंसाचारात उतरल्याचे चित्र दिसून आले आहे.
अहिल्यानगर: नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला आरोप–प्रत्यारोपाचा सिलसिला आता प्रत्यक्ष हिंसाचारात उतरल्याचे चित्र दिसून आले आहे. या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झाला असून कार्यकर्त्यांनी आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील दोषींना अटक करून कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे.
मॉर्निंग वॉकला निघाले आणि…
आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास सचिन गुजर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. याच वेळी दोन व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून अपहरण केल्याचा आरोप आहे. काही तासांनंतर त्यांना मारहाण झालेल्या अवस्थेत सोडून दिल्याचं समोर आलं आहे.
हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप
संबंधित व्यक्ती हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप केला जात आहे. अपहरण आणि मारहाण या दोन्ही घटनांचे काही क्षण CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
घटनेची माहिती मिळताच आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर यांचे कुटुंबीय आणि काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
advertisement
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव
पालिका निवडणुकीत आरोप–प्रत्यारोपाची मालिका सुरू असताना ही घटना घडल्याने राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीत प्रभाव टाकण्यासाठी विरोधी गटाने हल्ला घडवून आणला, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, CCTV फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
view commentsLocation :
Ahmad
First Published :
November 26, 2025 11:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahilya Nagar: नगर हादरलं! काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करुन मारहाण, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप


