नगरमध्ये पुन्हा हिट अँड रन! स्विफ्ट डिझायरने 6 वाहनांना उडवलं, 4 जण गंभीर

Last Updated:

Accident in Ahilyanagar: अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशीरा एका स्वीफ्ट कारने भरधाव वेगात येऊन सहा वाहनांना उडवलं आहे.

News18
News18
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशीरा एका स्वीफ्ट कारने भरधाव वेगात येऊन सहा वाहनांना उडवलं आहे. यात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौकात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा स्विफ्ट डिझायर कारने तुफान वेगात एका पाठोपाठ एक जवळपास सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन रिक्षा, दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, स्विफ्ट डिझायरच्या कचाट्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा चक्काचूर झाला असून वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
advertisement
या दुर्घटनेत तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला मॅक्स केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या धडक देणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा चालक अविनाश दराडे असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला? ज्यावेळी अपघात घडला, तेव्हा चालक दारुच्या नशेत होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
नगरमध्ये पुन्हा हिट अँड रन! स्विफ्ट डिझायरने 6 वाहनांना उडवलं, 4 जण गंभीर
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement