Snake News: पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या, शिर्डीत आढळला अत्यंत दुर्मिळ साप, तुम्ही पाहिलाये का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
Snake News: अहिल्यानगरमध्ये अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप आढळला. या सापाबद्दल जाणून घेऊ.
अहिल्यानगर: शिर्डी शहरात अतिशय दुर्मिळ असा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप आढळला आहे. जवळपास आठ ते नऊ वर्षांनंतर हा साप आढळून आला आहे. चॉकलेटी कलरचा आणि पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेला कवड्या साप सगळीकडे आढळून येतो. पण पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप अतिशय दुर्मिळ आहे. याच दुर्मिळ पिवळ्या ठिपक्यांच्या कवड्या सापाबद्दल सर्पमित्र संदीप खिरे यांनी लोकल18 च्या माध्यमातून माहिती दिली आहे.
पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या सापाचे शास्त्रीय नाव हे 'lycodon falvomaculatus' आहे. हा साप बिनविषारी आहे. परंतु, जवळपास आठ ते नऊ वर्षांनंतर हा साप आढळून आला आहे. सापाच्या संपूर्ण काळ्या रंगाच्या शरीरावर पिवळ्या ठिपक्यांचे आडवे पट्टे आहेत. तसेच पोटाकडील भागवर पांढरे ठिपके, डोळे काळे व डोक्याचा रंगही काळा असल्याने डोळे लवकर दिसत नाहीत. ओठांच्या खालचा भाग पांढरा आहे, असे खिरे सांगतात.
advertisement
पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या सापाची लांबी ही सरासरी 1 फूट असते. तर जास्तीत जास्त हा साप दीड फुटाचा असतो. या सापाचे प्रजनन हे अंडज असून ते जून-जुलै दरम्यान मादी 2 ते 4 अंडी घालते. ठिपक्यांचा कवड्या सापाचे खाद्य जंगली पाली, सरडे व काही वेळेस कीटक आहे. पिवळ्या ठिपक्यांचा कवडसा हा जास्त करून शहर व ग्रामीण भागातही आढळतो. तसेच पालीच्या शोधात घराजवळही हा साप आढळू शकतो.
advertisement
वैशिष्ट्ये काय?
view commentsपिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप हा निशाचर, शांत व लाजाळू मानला जातो. कवड्या सापाच्या तुलनेत याची संख्या खूपच कमी असल्याने क्वचितच दिसतो. शांत स्वभाव असल्याने क्वचित प्रसंगीच चावतो, असे या सापाचे वर्णन आहे. कवड्या सापाला अनेकवेळा मण्यार सापासोबत गोंधळात आणले जाते, पण तो बिनविषारी असतो. त्यामुळे त्याला ओळखणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी हा साप दुर्मिळ मानला जातो आणि त्यामुळे तो निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण असतो, असेही सर्पमित्र संदीप खिरे यांनी सांगितले.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
June 11, 2025 10:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Snake News: पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या, शिर्डीत आढळला अत्यंत दुर्मिळ साप, तुम्ही पाहिलाये का?

