पुण्यातील लाडकी बहीण सगळ्यांसमोर बोलली, अजितदादांच्या जिव्हारी लागलं, सहाव्या दिवशी प्रत्युत्तर

Last Updated:

NCP Nagpur Shibir: आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने कशी तयारी करावी? महापालिका जिंकण्यासाठी काय रणनीती असावी? या कारणासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे एक दिवसीय शिबिर नागपुरात संपन्न झाले.

अजित पवार (उपमुख्यमंत्री)
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
नागपूर : पुणे शहरातील मुंढवा केशवनगर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झालेले आहेत. नागरिकांच्या रोषाची दखल घेऊन प्रत्यक्षात पाहणीसाठी गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही एका भगिनीने दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांसारखे दुपारच्या वेळेत वाहतूक कोंडीतून फिरा, म्हणजे आमच्या अडचणी कळतील, असा उपरोधिक सल्ला दिला. भगिनीने सगळ्यांसमोर दिलेला सल्ला अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. अजित पवार यांनी तब्बल सहा दिवसांनंतर उपरोधिक सल्ल्यावर प्रत्युत्तर दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने कशी तयारी करावी? महापालिका जिंकण्यासाठी रणनीती काय असावी? या कारणासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे एक दिवसीय शिबिर नागपुरात संपन्न झाले. या शिबिराला संबोधित करताना अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. निवडणूक काळात तापट स्वभाव घेऊन लोकांमध्ये वावरू नका, असा सल्ला देताना पाच दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या एका प्रसंगाचा दाखला त्यांनी आपल्या भाषणात दिला.
advertisement

मनोहर पर्रीकरांसारखे फिरा, महिलेचा सल्ला, अजित दादांची सटकली

परवा पुण्यात एका ठिकाणी पाहणी करायला गेलो असतो मनोहर पर्रीकरांसारखे फिरा, असा सल्ला मला एका भगिनीने दिला. तिला काय माहिती हा अजित पवार सकाळी सहा वाजता उठून कामाला लागतो. विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी पुण्यातील भगिनीला उत्तर दिले. अजित पवार यांच्या या उत्तरावरून पर्रीकरांसारखे फिरा हा शब्द त्यांना चांगलाच बोचल्याचे दिसून आले. पुण्यातील भगिनीने दिलेल्या सल्ल्यानंतर तब्बल सहाव्या दिवशी अगदी लक्षात ठेवून अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिल्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावल्याचे दिसून आले.
advertisement

वादापासून दूर राहा

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, लोकांमध्ये गेल्यानंतर तत्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे तेवढ्यापुरते ऐकून घ्या. संबंधित माणूस अमुक दिशा पूर्व म्हटला तर 'तुम्हीही तू म्हणशील तसंच' असे म्हणा. त्याच्याशी वाद घालू नका... अशा सूचना करून वादविवादाचे प्रसंग टाळण्याचा सल्ला अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला.
advertisement

काही लोक आपल्याला अडचणीत आणण्यासाठी पाठवले जातात

काही लोक आपल्याला अडचणीत आणण्यासाठी पाठवण्यात येतात. तिथे कॅमेरा लावून आपण त्यांना उलटी उत्तरे देत आहेत, असा आरोप करून तेवढाच व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरवला जातो ज्यातून आपली बदनामी होते. या सूचना केवळ तुम्हालाच आहेत असे नाही तर माझ्याही मनाला मी हेच सांगत असतो, असे म्हणत सोलापूरच्या कुर्डू गावातील आयपीएस अधिकाऱ्याच्या फोन प्रसंगाचा अप्रत्यक्ष उल्लेख अजित पवार यांनी केला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यातील लाडकी बहीण सगळ्यांसमोर बोलली, अजितदादांच्या जिव्हारी लागलं, सहाव्या दिवशी प्रत्युत्तर
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement