Nashik News: सिन्नरमध्ये अजित पवारांच्या उमेदवारावर स्प्रेने हल्ला, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हल्ल्याचा Video समोर
- Reported by:Laxman Ghatol
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सिन्नरमध्ये अजित दादा राष्ट्रवादीच्या उमेदवारावर स्प्रेने हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाशिक : राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) रोजी मतदान सुरू आहे. राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात सध्या मतदानाची रणधुमाळी सुरू आहे. अशातच काही नगरपरिषदांमध्ये मोठ्या प्रमाणात तुफान राडा होताना बघायला मिळत आहे. अशातच आता नाशिकमध्ये मोठा गोंधळ पाहयला मिळाल आहे. आजपर्यंत आपण कुठे दगडफेक, कुठे लाकडी दांड्याने मारहाण झाल्याची प्रकरण ऐकली होती. मात्र सिन्नरमध्ये अजित दादा राष्ट्रवादीच्या उमेदवारावर स्प्रेने हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाशिकच्या सिन्नरमध्ये मतदानादरम्यान वाद झाल्यानंतर दोन गटात मारहाण झाली. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून मोठी खळबळ उडाली आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार किरण गोजरे यांच्यावर स्प्रेने हल्ला केल्याचा व्हिडिओ आला समोर आला आहे. यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हवेत मिरचीचा स्प्रे मारल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात गेला असून काही जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागला.
advertisement
किरण गोजरे यांच्यावर स्प्रेने हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार, सिन्नरमध्ये मतदानावरून दोन गटात प्रचंड राडा झाला. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. दोन्ही गटाचा वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांच्या कॉलर पकडल्या. मात्र त्यावेळी विरोधी पक्षातील एकाने अजित दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार किरण गोजरे यांच्यावर स्प्रेने हल्ला केला. त्यानंतर मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला.
advertisement
सिन्नर - एकूण जागा 30+1
1. हेमंत वाजे, भाजप
2. प्रमोद चोथवे, महाविकास आघाडी
3. विठ्ठलराजे उगले, अजित पवार
4. नामदेव लोंढे, शिवसेना शिंदे गट
अजित पवार राष्ट्रवादी आणि उबाठा उमेदवारात काटे की टक्कर
मतदान केंद्राच्या बाहेर तणावाचे वातावरण
सिन्नर येथे भाजपकडून उमेदवारांनी पैसे वाटल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ झाला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांना समज दिली. त्यानंतर पुन्हा वाद पाहायला मिळाला आणि यातूनच स्प्रे मारण्यात आला. काही काळ मतदान केंद्राच्या बाहेर तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. सिन्नर नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समोरासमोर आहेत. महायुतीतील तिघही उमेदवार समोरासमोर निवडणूक लढवत आहे.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Dec 02, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News: सिन्नरमध्ये अजित पवारांच्या उमेदवारावर स्प्रेने हल्ला, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हल्ल्याचा Video समोर









