Ajit Pawar : 1-2 नाही 6 पोस्ट, अजित पवार यांची शेवटची Instagram Post, काय म्हणाले होते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ajit Pawar Died In Plane Crash : अजित पवार सोशल मीडियावरही चांगलेच अॅक्टिव्ह होते. 2 दिवसांपूर्वी त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट केली होती, ही पोस्ट त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. बारामतीत सभेसाठी जात असताना त्यांनी गोजुबावी इथं त्यांचं प्लेन क्रॅश झालं. दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अजित पवार सोशल मीडियावरही चांगलेच अॅक्टिव्ह होते. 2 दिवसांपूर्वी त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट केली होती, ही पोस्ट त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली.
2 दिवसांपूर्वी 26 जानेवारी, यादिवशीची अजित पवार यांची पोस्ट शेवटची पोस्ट ठरली आहे. अजित पवार यांचं इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी तुम्हाला त्यांच्या अकाऊंटवर 6 पोस्ट दिसतील. त्यांनी त्यांच्या या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून आपलं देशप्रेम दाखवलं होतं. त्यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. झेंडावंदनाची आहे.
advertisement
अजित पवार प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील पोलीस संचनल मैदानात झेंडावंदन करायला गेले, तिथला व्हिडीओ त्यांनी सोशळ मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओला वंदे मातरम हे गाणं लावलं आहे, तसंच कॅप्शनमध्ये संविधान, एकता, लोकशाही प्रजासत्ताक दिन चिरायू होवो असं व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटलं आहे. ज्यात अजित पवार सॅल्युट करताना दिसत आहेत. तर कॅप्शनमध्ये बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, अशी ओळ लिहिली आहे.
advertisement
advertisement
तसंच आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी इथले फोटोही पोस्ट केले आहेत. त्याच दिवसाच्या सुरुवातीला त्यांनी प्रजासत्ता दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देणारा फोटो टाकला होता. तसंच एका व्हिडीओमध्ये अजित पवार नांदेडमधील गुरुद्वारामध्ये दर्शन घेताना दिसले.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 11:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : 1-2 नाही 6 पोस्ट, अजित पवार यांची शेवटची Instagram Post, काय म्हणाले होते?










