अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात

Last Updated:

Kiran Lahamate: अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील विटे घाटात आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाला.

किरण लहामटे (राष्ट्रवादी, आमदार)
किरण लहामटे (राष्ट्रवादी, आमदार)
अकोले, अहिल्यानगर : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले गेले.
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील विटे घाटात आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाला. अकोले येथून राजूरकडे जाताना त्यांच्या गाडीला ट्रकची समोरासमोर धडक बसली. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे या अपघातातून थोडक्यात बचावले.
दरम्यान, अपघातात लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली. प्राथमिक उपचारानंतर आमदार लहामटे राजूर येथील निवासस्थानी गेले.

कोण आहेत किरण लहामटे?

advertisement
-किरण लहामटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत
-एकत्रित राष्ट्रवादी असताना ते अकोलेचे आमदार होते
-शरद पवार यांनी त्यांना पिचड यांच्याविरोधात उमेदवारी देऊन अकोलेतून निवडून आणले होते
-मात्र राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणे पसंत केले
-विधानसभा निवडणूक २०२४ ला अजित पवार यांनी पुन्हा किरण लहामटे यांना उमेदवारी दिली
advertisement
-यंदाच्या विधानसभा निवडणूक पुन्हा लहामटे यांनी जिंकून सलग दुसऱ्यांदा विधिमंडळात प्रवेश केला.
-अकोल्याची ओळख आदिवासीबहुल मतदारसंघ आहे, आदिवासींसाठी लढणारे नेते म्हणूनही लहामटे यांची ओळख होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement