advertisement

अजितदादांसोबत काय घडलं? रोहित पवार स्वत: घेणार शोध, गुप्तहेरांशी साधला संपर्क, घडामोडींना वेग

Last Updated:

अजित पवारांच्या विमान अपघाताला २० दिवस झाले. तपासयंत्रणांकडून अद्याप याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. यामुळे रोहित पवारांनी आता मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

News18
News18
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांचा अपघात नसून हा घातपात असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावरून शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार आक्रमक झाले आहेत.
त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या. अजित पवारांचा अपघात हा एका कटाचा भाग असू शकतो. त्यांच्यासोबत घातपात घडल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि डीजीसीएकडून केला जात आहे. घटनेला २० दिवस उलटूनही अद्याप याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. यामुळे रोहित पवारांनी आता मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
advertisement
सरकारी तपास यंत्रणा योग्य प्रकारे तपास करत नसल्याने रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास करण्यासाठी खासगी गुप्तहेर संस्थेशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी दादांच्या विमान अपघाताचा तपास करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेतली आहे, याबाबतचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. राजधानी दिल्लीत त्यांनी दोन खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली. यातील एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचं काम दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी तपास यंत्रणांवर रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी हे खासगी गुप्तहेर संस्थांकडून या अपघाताचा तपास करून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
रोहित पवार यांनी यापूर्वीच अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले होते. अजित पवार मुंबईतून बारामतीच्या दिशेनं येताना नेमकं काय काय घडलं? याच्या प्रत्येक मिनिटांची माहिती रोहित पवारांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. यात अनेक बारकावे नमूद करण्यात आले होते? शंका उपस्थित करण्यात आली होती. आता अजित पवारांचा अपघात घडून २० दिवस उलटूनही काहीच समोर न आल्याने रोहित पवारांनी या घटनेचा तपास खासगी गुप्तहेर संस्थेकडून करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांसोबत काय घडलं? रोहित पवार स्वत: घेणार शोध, गुप्तहेरांशी साधला संपर्क, घडामोडींना वेग
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement