advertisement

अजितदादांच्या विमान अपघाताला नवं वळण, ब्लॅक बॉक्स खराब झाला? रोहित पवारांकडून गंभीर आरोप

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे.

News18
News18
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. या अपघाताला २० दिवस उलटूनही अद्याप ठोस माहिती समोर न आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर गंभीर संशय व्यक्त केला आहे. "हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता आहे," असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

ब्लॅक बॉक्सवरून वादाची ठिणगी

रोहित पवार यांनी प्रामुख्याने विमानातील 'ब्लॅक बॉक्स' बाबत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर देखील बोट ठेवलं . सामान्यतः विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही, मात्र सध्या "ब्लॅक बॉक्स बंद होता" किंवा "तो जळून खराब झाला आहे," अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. यावर आक्षेप घेत रोहित पवार म्हणाले की, "अचानक सुरू झालेल्या या चर्चांमुळे घातपाताचा संशय बळावला आहे. ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी परदेशातील प्रयोगशाळेत पाठवल्याच्या बातम्या आताच का समोर येत आहेत?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
advertisement
अपघाताला २० दिवस होऊनही नागरी विमान वाहतूक संचालनालयाचा (DGCA) प्राथमिक अहवाल अद्याप का आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तपासातील या विलंबामागे काही विशिष्ट हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला. केवळ व्हीएसआर (VSR) कंपनीला पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तर हा उशीर केला जात नाहीये ना? या कंपनीवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे? समाजात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
advertisement

"उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही"

रोहित पवार यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केलं की, दिवसभर सुरू असलेल्या चर्चांवरून या प्रकरणातील गूढ अधिकच वाढत आहे. "आम्ही या घटनेचा छडा लावल्याशिवाय आणि हा अपघात होता की घातपात याचे सत्य समोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आरोपामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सरकार आणि तपास यंत्रणा यावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या विमान अपघाताला नवं वळण, ब्लॅक बॉक्स खराब झाला? रोहित पवारांकडून गंभीर आरोप
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement