महाराष्ट्रातील या गावात साजरा होतो गाढवांचा पोळा; गृहिणी करतात भक्तिभावानं पूजा

Last Updated:

वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रात एक असंही गाव आहे, जिथे गाढवांचा पोळा साजरा केला जातो.

News18
News18
अकोला, 15 सप्टेंबर, कुंदन जाधव : वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रात एक असंही गाव आहे, जीथं चक्क गाढवांचा पोळा साजरा करण्यात येतो. गाढवांवर उपजीविका असणारे गाढवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाढवांचा पोळा साजरा करतात.  अकोल्यातील अकोट या ठिकाणी गाढवांचा पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
अकोल्यातील अकोट या ठिकाणी बैलांप्रमाणे गाढवाची पूजा करून पोळा साजरा केला जातो. पोळा हा सण शेतकरी बैलांबद्दल असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. मात्र अकोल्यातील अकोटमध्ये गाढवांचा पोळा साजरा केला जातो. गाढवांप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या गावात ही प्रथा सुरू झाली. येथील भोई समाज हा या दिवशी गाढवांची पूजा करतो.
advertisement
  असा साजरा होतो गाढवांचा पोळा
पोळ्याच्या दिवशी गाढवांना आंघोळ घातली जाते. त्याला बैलाप्रमाणे सजविले जाते. वेगवेगळ्या रंगाने रंगविले जाते. संध्याकाळी सर्व गाढवांना एका ठिकाणी उभे करून त्यांची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते. घरात बनविलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो. गाढवांना ठोंबरा (भिजवून ठेवलेल्या ज्वारीच्या कणकीचा गोळा) खाऊ घातला जातो. पुरुषांप्रमाणेच घरातील गृहिणी देखील आपल्या घरच्या गाढवाची भक्तिभावाने पूजा करतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
महाराष्ट्रातील या गावात साजरा होतो गाढवांचा पोळा; गृहिणी करतात भक्तिभावानं पूजा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement