advertisement

१२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेसने मोठं पाऊल उचललं, सपकाळांनी आदेश काढले, नगरसेवकांची धडधड वाढली

Last Updated:

भाजपसोबत युती केलेल्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचे पाऊल काँग्रेस पक्षाने उचलले. पक्षाच्या कारवाईच्या भूमिकेमुळे काँग्रेस नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

अंबरनाथ नगर परिषद निवडणूक
अंबरनाथ नगर परिषद निवडणूक
अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथ नगर पालिका निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी युती केल्यामुळे वरिष्ठ स्तरावरील नाराजी व्यक्त केली गेली. यानंतर युतीसाठी तयार झालेल्या काँग्रेस नगरसेवकांवर कारवाईचा इशारा वरिष्ठांकडून दिल्यामुळे त्यांनी अधिकृतरित्या थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचेच ठरवले. याचाच अर्थ काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक थेटपणे भारतीय जनता पक्षात गेल्याने काँग्रेसला जबर झटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने पक्ष कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी केली आहे. भाजप काँग्रेसच्या युतीत सत्ताप्रिय अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी आहे. एरवी इतर पक्षांत युती आघाडी होत असतात, तुटत असतात पण राज्य आणि देशपातळीवर विचारधारेच्या मुद्द्यावरून लढणाऱ्या काँग्रेस-भाजपची युती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. दोन्ही पक्षांवर टीका सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पावले उचलून नगरसेवकांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले. पक्षाच्या कारवाईच्या भूमिकेमुळे काँग्रेस नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला.
advertisement

त्या नगरसेवकांविरोधात काँग्रेसने मोठं पाऊल उचललं, सपकाळांनी आदेश काढले

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सदर प्रकार हा पूर्णपणे बेकायदेशीर असून या सर्व १२ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे.
स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अनैतिक तर आहेच पण असंवैधानिकही आहे. लवकरच या सर्वांना कायदेशीर नोटीसा बजावण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
१२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेसने मोठं पाऊल उचललं, सपकाळांनी आदेश काढले, नगरसेवकांची धडधड वाढली
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement