advertisement

त्या विमानासमोर फोटो, अजितदादांच्या अपघातामागे कॅप्टन खरातचा हात? नव्या दाव्याने राज्यात खळबळ

Last Updated:

अजित पवार यांच्या विमान अपघातावर अगदी सुरुवातीपासून अमोल मिटकरी सातत्याने सवाल उपस्थित करीत आहेत. आता त्यांच्या नव्या मागणीने राज्यात खळबळ माजली आहे.

अजित पवार-अशोक खरात
अजित पवार-अशोक खरात
कुंदन जाधव, प्रतिनिधी, अकोला : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने विविध आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यादरम्यान नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याचा संबंध अजित पवार यांच्या अपघातामागे आहे का? याचा तपास करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातावर अगदी सुरुवातीपासून अमोल मिटकरी सातत्याने सवाल उपस्थित करीत आहेत. विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून मालकाच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे कांड समोर आल्यानंतर आणि राजकीय नेत्यांची त्याच्याकडे असलेली उठबस पाहता अजित पवार यांच्या विमान अपघातामागे त्याचा काही हात आहे का? असा सवाल उपस्थित करीत मिटकरी यांनी चौकशीची मागणी केली आहे.
advertisement

भोंदू बाबा कॅप्टन खरातचा भांडाफोड

मिटकरी म्हणाले, कॅप्टन खरात नावाच्या भोंदू बाबाचा भांडाफोड काल पासून सुरू आहे. त्याच्या अश्लील व्हिडीओ क्लिप्स पोलिसांनी छापेमारीत जप्त केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. एका तक्रारीवरून त्याच्यावर ही कारवाई झाली आहे. मात्र त्याचा भक्त संप्रदाय राजकीय आणि बॉलिवूडपर्यंत असल्याचे कळत आहे.

जादूटोणा करण्याचा प्रयत्न अशोक थोरात याच्या सांगण्यावरून झाला का?

advertisement
अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा व्हीएसआर विमान कंपनीच्या पायलटसोबत तसेच त्याच विमानासमोर उभा आहे. काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी आणि देवगिरी बंगल्यासमोर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा थोतांडावर आमचा किंवा अजितदादांचा विश्वास नव्हता, मात्र हा झालेला प्रयोग अशोक थोरात याच्या सांगण्यावरून झाला का? आणि याचा धागा व्हीएसआर कंपनीपर्यंत जात असेल तर, अजितदादांच्या घातपातामागे कॅप्टन थोरतांचा हात असल्याचा संशय बळावतो. म्हणून अजित दादांच्या विमान अपघात संदर्भात कॅप्टन थोरात याचा कसून तपास झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
advertisement

कोण आहे कॅप्टन अशोक खरात?

कॅप्टन खरात हा सैन्यदलातील निवृत्त अधिकारी आहे
गुरू मुजूमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मॉलॉजीचे शिक्षणही त्याने घेतले आहे
सैन्य दलातील २० वर्षांच्या सेवा काळात तो तब्बल १५४ देश फिरल्याचे बोलले जाते
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कॅप्टन खरात याची एक आध्यात्मिक संस्था आहे
शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट आहे
advertisement
याच ट्रस्टचा संस्थापक अशोक खरात असून रूपाली चाकणकर सदस्या आहेत
अनेक राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील महत्त्वाचे लोक खरात याच्याकडे भविष्य पाहायला जात असत.
अनेक राजकीय नेत्यांसोबत आणि राजकारणी कुटुंबासोबत खरात याचे घनिष्ठ संबंध आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
त्या विमानासमोर फोटो, अजितदादांच्या अपघातामागे कॅप्टन खरातचा हात? नव्या दाव्याने राज्यात खळबळ
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement