महाराष्ट्रातली अशी ग्रामपंचायत जिथे आईच्या नावाने आहे पाट्या, अख्खं गाव करतंय कौतुक!

Last Updated:

जागतिक महिला दिनानिमित्त राज्य शासनाकडून मार्च 2024 मध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेटवर वडिलांसह आईचेही नाव असणे बंधनकारक करावे असे सांगण्यात आले. हा निर्णय गांभीर्याने घेणारे बोटावर मोजण्या इतकेच शासकीय कार्यालय आहे. त्यापैकी एक म्हणजे अमरावती मधील मोझरी ग्रामपंचायत. 

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या नावाच्या पाटीवर त्यांच्या वडिलांसह आईचेही नावं असणे बंधनकारक करावे असा निर्णय मार्च 2024 मध्ये घेण्यात आला. पण, कोणीही या निर्णयाला गांभीर्याने घेतले नाही. तुरळक ठिकाणी या निर्णयाची अंमबजावणी झाली असेल. अमरावतीमधील तिवसा येथील नायब तहसिलदार हे आईच्या नावाने नेम प्लेट लावणारे एकमेव अधिकारी ठरल्यानंतर अमरावती मधील तिवसा तालुक्यात असलेल्या मोझरी ग्रामपंचायतीमध्ये काही दिवसांपूर्वी या निर्णयाची अंमबजावणी करण्यात आली. त्यामुळे या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
advertisement
मोझरी येथील सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या पुढाकाराने सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांच्या नावाच्या पाटीवर त्यांच्या आईचे नाव लिहण्यात आले. नेमप्लेटवर आईच्या नावाचा उल्लेख करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक ठरलेली मोझरी ग्रामपंचायत आहे.
याबाबत लोकल 18 ने ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांच्याशी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, शासनाचे कोणतेही निर्णय असो आम्ही त्यावर लवकरात लवकर अंमलबावणी करण्याचा प्रयत्न करतो. या निर्णयावर सुद्धा आम्ही खूप आधी काम सुरू केले. एकमेकांशी चर्चा केली आणि गेल्या तीन महिन्यात आईच्या नावासह पाटी लावून घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा उत्तम निर्णय आहे. असेच नवनवीन उपक्रम आणि योजना आल्यात तर आम्ही त्यांचे आनंदाने स्वागत करू असे सरपंच सुरेंद्र भिवगडे यांनी सांगितले.
advertisement
ग्रामपंचायत अधिकारी सुरेश झोलेकर सांगतात की, मोझरी ग्रामपंचायतमध्ये आलेले कोणतेही पत्रक असो त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाते. गावकरी आणि संपूर्ण ग्रामपंचायत कार्यकारिणी आम्हाला सपोर्ट करतात. त्यांच्या सहकार्यातून कोणतेही काम करणे या गावात कठीण नाही.
सरपंच सुद्धा तातडीने सर्व निर्णय अमलात आणतात. आईच्या नावाने पाटी लावण्यासाठी सरपंच आणि इतर कार्यकारिणीचा सहभाग आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मोझरी हे गाव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे. त्यांच्या विचारांचा वारसा सुद्धा या गावात जपला जातो. त्यामुळे इथे कोणतेही काम शक्य होते. पुढेही शासनाकडून आलेले कोणतेही चांगले उपक्रम आम्ही नक्की राबवून घेऊ, असे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
महाराष्ट्रातली अशी ग्रामपंचायत जिथे आईच्या नावाने आहे पाट्या, अख्खं गाव करतंय कौतुक!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement