अपघाती मृत्यू पावलेल्यांचं श्राद्ध पितृपक्षात नेमकं कधी घालतात, हा योग अगदी योग्य दिवस, पूर्वजांना मिळते मुक्ती

Last Updated:

pitru paksha 2024 : ज्योतिषी प्रफुल येलकर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्ध ही तिथी अनैसर्गिकरित्या म्हणजेच, अपघाती, सर्पदंश, आत्महत्या या प्रकाराने मृत्यू पावलेल्या लोकांसाठी राखीव आहे.

+
पितृपक्ष

पितृपक्ष 2024

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती - जर पूर्वज सुखी असतील तर संपूर्ण कुटुंब संपत्ती, समृद्धी आणि सुखात न्हाऊन निघते, असे म्हटले जाते. त्यामुळेच देवी-देवतांच्या पूजेबरोबरच पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी लोक श्राद्ध करतात. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे.
यावर्षीचा पितृपक्ष हा 18 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. पितृपक्षाच्या काळात अनेक महत्त्वाच्या तिथी आहेत. प्रत्येक तिथी ही राखीव आहे. या सर्व तिथीमधील 1 तिथी म्हणजे येत्या 1 ऑक्टोबरला असणारे चतुर्दशी श्राद्ध ही तिथी आहे. ही तिथी कोणासाठी राखीव आहे? या तिथीला काय केले जाते? हे जाणून घेऊयात.
advertisement
ज्योतिषी प्रफुल येलकर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्ध ही तिथी अनैसर्गिकरित्या म्हणजेच, अपघाती, सर्पदंश, आत्महत्या या प्रकाराने मृत्यू पावलेल्या लोकांसाठी राखीव आहे. अपघाती मृत्यू पावलेल्या लोकांच्या श्राद्धविधी या दिवशी केल्यास आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या तिथीला श्राद्धविधीबरोबरच अन्नदान सुद्धा करू शकता.
advertisement
त्याचबरोबर या वर्षीच्या पितृपक्षाचे विशेष म्हणजे पितृपक्षाच्या सुरवातीला चंद्रग्रहण तर समाप्तीला सूर्यग्रहण आहे. त्यामुळे हा काळ कालसर्पदोषामध्ये येतो, असे पंचांगमध्ये सांगितले आहे. त्यामुळे याकाळात कालसर्पदोषाची पूजाविधी केली असता या दोषाचे निवारण होते, असेही ज्योतिषी प्रफुल येलकर यांनी सांगितले. 
advertisement
पितृपक्षाचे 15 दिवस हे पितरांना समर्पित असतात. या 15 दिवसांमध्ये पूर्वज पूर्वज जगातून पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. अशा स्थितीत पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, पिंडदान इत्यादी करण्याची परंपरा आहे, असे केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो.
सूचना - ही माहिती ज्योतिषांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही. 
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
अपघाती मृत्यू पावलेल्यांचं श्राद्ध पितृपक्षात नेमकं कधी घालतात, हा योग अगदी योग्य दिवस, पूर्वजांना मिळते मुक्ती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement