'काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार', मोदींनी ज्यांना लहान भाऊ म्हटलं त्याच नेत्याची सडकून टीका!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या नेत्याचा उल्लेख लहान भाऊ केला, त्याच नेत्याने भाजपवर सडकून टीका केली आहे.
अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह अनेक लहान पक्षांचा सुफडा साफ झाला आहे. सर्वात जास्त जागा जिंकत भाजप महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. पण राज्यात भाजपची ताकद वाढल्यानंतर महायुतीतल्या इतर लहान मोठ्या पक्षांची अडचण झाली आहे. मंत्रीपदं आणि पालकमंत्रीपदांवरून अजित पवार गट आणि शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. या दोन्ही गटाकडून भाजपवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं जातंय.
दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस गद्दार असेल तर भाजप महागद्दार आहे, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत जानकर यांचा उल्लेख लहान भाऊ केला. भाजपच्याच पाठिंब्यावर त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
advertisement
आता जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपला मतदान करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. ते अमरावती येथे आयोजित केलेल्या ‘वाडा' आंदोलनात बोलत होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी ‘वाडा आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे.
advertisement
यावेळी महादेव जानकर म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेला काय झालं? मी आणि बच्चू कडू स्वतंत्र लढलो. त्या बच्चू कडूलाही पाडलं आणि मलाही खासदारकीला पाडलं. मी जर खासदार झालो असतो तर दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते. शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांना माझी विनंती आहे की, इथून पुढे मोठ्या पार्टीला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार आहेच, पण भाजप महागद्दार आहे, असा घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केलाय. अमरावतीत बच्चू कडूच्या आंदोलनादरम्यान त्यांनी ही टीका केलीय. अमरावतीत बच्चू कडू यांच्या मोर्चाला जानकर यांची उपस्थिती होती
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
January 08, 2025 7:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
'काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार', मोदींनी ज्यांना लहान भाऊ म्हटलं त्याच नेत्याची सडकून टीका!


