Amruta Fadnavis : ''...ते पुन्हा आलेत'', फडणवीसांच्या शपथविधीआधी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Last Updated:

Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या या शपथविधीवर नेमकं काय बोलल्या आहेत? हे जाणून घेऊयात.

Amruta Fadnavis On Devendra Fadnavis
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : महायुतीच्यी शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधीस्थळी दाखल झाले आहेत. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या या शपथविधीवर नेमकं काय बोलल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
अमृता फडणवीस माध्यमांशी बोलत होत्या.यावेळी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. महायुती आता एकत्रित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची वाटचाल आजपासून सूरू केलेली आहे. याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुढे अमृता फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांचे जीवन संघर्षमय राहिले आहे, मी त्यांना जवळून पाहिलेले आहे. ते जे काय ठरवतात ते करून दाखवतात, अशी त्यांची जिद्द आहे. त्यांच्यात जिद्द, चिकाठी,धीर असे गुण आहेत त्यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे आज ते इथपर्यंत पोहोचलं आहे, असे कौतुक अमृता फडणवीस यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रासाठी त्यांना खूप काम करायच आहे.त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे, असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
advertisement
तसेच देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद 2019 च्या निवडणुकीनंतर हुकल्यानंतर त्यांनी मी पुन्हा येईन असे विधान केले होते. या विधानावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी परत यायचं नाही आहे. तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, ते जे महाराष्ट्रासाठी करू शकतील ते कुणीही करू शकणार नाही. आणि लोकांच्या विश्वासामुळे ते पुन्हा येतायत, याचा मला आनंद असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amruta Fadnavis : ''...ते पुन्हा आलेत'', फडणवीसांच्या शपथविधीआधी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement