गृहिणींचं बजेट कोलमडणार, फोडणी बिघडणार; टोमॅटो मिरच्यांसह भाज्या महाग; इथे चेक करा दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. भाज्यांचे दर होलसेल मार्केटमध्ये कडाडले आहेत. गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.
अविनाश कानडजे/ प्रमोद पाटील प्रतिनिधी : अवकाळी पावसानं आधी झोडपलं आणि आता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अजिबात पाऊसच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधी हिटवेव आणि आता मुसळधार पाऊस यामुळे मोठा फटका बसला आहे. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. भाज्यांचे दर होलसेल मार्केटमध्ये कडाडले आहेत. गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात येणाऱ्या टोमॅटोचे दर दर गगनाला भिडले आहेत. 25 ते 30 रुपयांनी मिळणारा टोमॅटो आता 60 ते ८० रुपये किलोवर गेला आहे. त्यातही पाऊस पडल्याने टोमॅटो पटकन खराब होत आहे. मागच्या दिवसात अवकाळी पाऊस आणि प्रचंड उकाडा अशा वातावरणाचा टोमॅटोला फटका बसला आहे.
पुढील काही काळात आवक वाढणार असून दर खाली येतील असा विश्वास यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाज्यांनी शंभरी पार केली. त्यामुळे भाज्या घ्यायच्या की नाही असा प्रश्न आता गृहिणींसमोर आहे.
advertisement
छत्रपती संभाजी नगर मध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे सर्वात मोठ्या जाधव वाडी मंडी मध्ये भाजीपाल्याला प्रचंड भावाला आहे. सर्वच वस्तू या शंभरी पार गेल्या आहेत. सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे आवाक्याच्या बाहेर झाले आहे. शेवगा रेकॉर्ड करून 200 रुपये किलो विकल्या जातोय. त्यामुळे नेहमी चालायला ही जागा न मिळणाऱ्या या भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
advertisement
कोणत्या भाजीला किती भाव पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून
शेवगा: 160 रुपये किलो
गोबी: 100 रुपये किलो
टोमॅटो : 100 रुपये किलो
मिरची: 100 रुपये किलो
गवार: 100 रुपये किलो
वांगी: 100 रुपये किलो
मेथी: 40 रुपयाला एक जुडी; 160 रुपये किलो
पालक: 30 रुपये जुडी; 120 रुपये किलो
view commentsLocation :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
June 26, 2024 8:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गृहिणींचं बजेट कोलमडणार, फोडणी बिघडणार; टोमॅटो मिरच्यांसह भाज्या महाग; इथे चेक करा दर


