ऑपरेशन टायगरची चाहूल लागताच एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर, त्या ११ जणांसोबत तातडीची बैठक
- Published by:Prachi Amale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
ज्या नगरसेवकांबाबत गैरसमज पसरवले जात होते, त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुंबई : एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेले १५ माजी नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली अन् राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक चर्चांना उधाण आले. मात्र ही बातमी समोर येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंनी तातडीने या नाराज आमदारांची बैठक घेतली.
मुंबई महापालिकेतील काही माजी नगरसेवक शिवसेनेतून उबाठात जाणार असल्याच्या वावड्या पसरवल्या जात होत्या. ज्या नगरसेवकांबाबत गैरसमज पसरवले जात होते, त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सर्व नगरसेवक खंबीरपणे शिवसेनेत असल्याची ग्वाही देतानाच, येणारी निवडणूक दणदणीत मताधिक्याने जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केलाय.
तब्बल दीड तास चालली बैठक
advertisement
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भूसे यांच्या बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होती. या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणूकांचू रणनिती संदर्भात चर्चा होणार आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बैठक घेतली. आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून द्याव्यात, अशा सूचना सर्व आमदार व खासदारांना देण्यात आल्या.
advertisement
बैठकीसाठी उपस्थित राहिलेले मंत्री आमदार आणि खासदार
मंत्री उदय सामंत,
मंत्री शंभूराजे देसाई
मंत्री संजय शिरसाट
मंत्री दादाजी भुसे
राज्यमंत्री योगेश कदम
आमदार अब्दुल सत्तार
आमदार दीपक केसरकर
आमदार नीलम गोरे
आमदार निलेश राणे
आमदार प्रकाश सुर्वे
आमदार शहाजी बापू पाटील
आमदार महेंद्र दळवी
आमदार मंगेश कुडाळकर
आमदार दिलीप मामा लांडे
advertisement
आमदार मनीषा कायंदे
आमदार तुकाराम काते
आमदार सुहास कांदे
राजेंद्र गावित
माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे
संजय गायकवाड
मंजुळाताई गावित
खासदार नरेश मस्के
खासदार श्रीरंग बारणे
खासदार रवींद्र वायकर
खासदार संदीपान भुमरे
खासदार मिलिंद देवरा
माजी खासदार संजय निरुपम
खासदार प्रतापराव जाधव
माजी खासदार गजानन कीर्तिकर
माजी खासदार राहुल शेवाळे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 10:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऑपरेशन टायगरची चाहूल लागताच एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर, त्या ११ जणांसोबत तातडीची बैठक