BJP Voter List: भाजपनेही मतदारयादीवर बॉम्ब फोडला, मविआच्या कोणत्या आमदारांना दुबारांचा फायदा? यादीच दाखवली
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Tushar Rupanwar
Last Updated:
Ashish Shelar On Voter List :मतदारयादीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चाला आज भाजपने पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.
मुंबई: मतदारयादीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चाला आज भाजपने पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. मतचोरीच्या मुद्यावर विरोधक आरडाओरड करत असले तरी वोट जिहादचा पुळका आला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप नेते आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची संख्याच जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत म्हटले होते की महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच, आज आम्ही यादी दाखवत असल्याचे शेलार यांनी म्हटले.
आशिष शेलार यांनी म्हटले की, राज ठाकरेंनी तर तीन कथित दुबार मतदारांची नावेही घेतली.कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी येथील मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केले, असे त्यांनी सांगितले. यामध्ये जी नावे त्यांनी सांगितली ती आहेत, प्रभाकर तुकाराम पाटील, राम मधु भोईर, गजानन पुंडलिक भोईर अशी आहेत. पण, त्यांना मुस्लिम दुबार मतदार दिसत नसल्याचे शेलार यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली गेली आणि हे पाप महाविकास आघाडीने केले. हा एक सुनियोजित ‘व्होटजिहाद’ होता. देश, देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार होता, असा आरोप शेलार यांनी केला.
advertisement
हिंदू दुबार मतदारांवरून आरोप करताना मविआ आणि राज ठाकरे यांच्याकडून मुस्लिक, अल्पसंख्याक मतदारांवर मौन बाळगले जात असल्याचा आरोप शेलार यांनी केला. केवळ तुष्टीकरणासाठीची मांडणी करत मराठी आणि इतर हिंदू धर्मीयांच्या मतदारांवर आक्षेप घेत जात असल्याचे शेलार यांनी म्हटले.
शेलार यांनी म्हटले की, लोकसभेत महाविकास आघाडीची मते 2 कोटी 50 लाख 15 हजार 819 इतकी होती. तर, लोकसभेत महायुतीला मिळालेली मते 2 कोटी 48 लाख 12 हजार 627 इतकी होती. हे अंतर होते, 2 लाख 3 हजार आणि 192 इतक्या मतांचे होते. आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण केले.यात केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 इतकी असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपकडून संपूर्ण 288 मतदारसंघांवरही काम सुरू आहे. 16 लाख 84 हजार 256 मतदार आहेत. ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या असल्याचे शेलार यांनी म्हटले. ही संख्या मोठी असू शकते असा दावाही त्यांनी केला.
advertisement
>> मविआच्या कोणत्या आमदाराच्या मतदारसंघात दुबार मतदार?
> रोहित पवार
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ
रोहित पवार जिंकले 1243 मतांनी. पण, त्यांच्या या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आहे 5532.
> नाना पटोले
साकोली विधानसभा मतदारसंघ
नाना पटोले जिंकले 208 मतांनी. पण, त्यांच्या मतदारसंघात 477 दुबार मते ही मुस्लिमांची
> वरुण सरदेसाई
advertisement
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
वरुण सरदेसाई जिंकले 11,365 मतांनी. पण, त्यांच्या मतदारसंघात 13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आहेत.
> बीड विधानसभा : संदीप क्षीरसागर
जिंकले 5324 मतांनी/ 14,944 दुबार मुस्लिम मते
> मुंब्रा विधानसभा: जितेंद्र आव्हाड
30,601 दुबार मुस्लिम मते
> माळशिरस विधानसभा : उत्तम जानकर
4399 दुबार मुस्लिम मते
advertisement
> घनसावंगी विधानसभा : राजेश टोपे
11,751 दुबार मुस्लिम मते
केवळ 2309 मतांनी येथे शिवसेना निवडून आली.
> लातूर शहर : अमित देशमुख
20,613 दुबार मुस्लिम मते
> धारावी : ज्योती गायकवाड
10,689 दुबार मुस्लिम मते
> मुंबादेवी : अमीन पटेल
11,126 दुबार मुस्लिम मते
> उत्तर नागपूर : नितीन राऊत
advertisement
8342 दुबार मुस्लिम मते
> मालाड पश्चिम : अस्लम शेख
17,007 दुबार मुस्लिम मते, ते जिंकले 6227 मतांनी.
> परभणी : राहुल पाटील
13,313 दुबार मुस्लिम मते
> विक्रोळी : सुनील राऊत
3450 दुबार मुस्लिम मते. किमान सुनील राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती.
> कलिना : संजय पोतनीस
6973 दुबार मुस्लिम मते, जिंकले 5008 मतांनी
advertisement
> जोगेश्वरी पूर्व : अनंत नार
6441 दुबार मुस्लिम मते, जिंकले 1541 मतांनी
> बाळापूर : नितीन देशमुख
5251 दुबार मुस्लिम मतदार
> दिंडोशी : सुनील प्रभू
5347 दुबार मुस्लिम मते, 6182 मतांनी जिंकले
> धाराशिव : कैलास पाटील
11,242 दुबार मुस्लिम मते
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Voter List: भाजपनेही मतदारयादीवर बॉम्ब फोडला, मविआच्या कोणत्या आमदारांना दुबारांचा फायदा? यादीच दाखवली


