advertisement

Neeraj Jadav: 'अबतक 58' अशोक खरातचा करेक्ट कार्यक्रम करणारा नीरज जाधव कोण? 'बॉस'चा वाजवणार होता गेम! A to Z माहिती

Last Updated:

 नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. ऑफिसमध्ये आपला बॉस खरात हा महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं त्याच्या नजरेस पडलं.

News18
News18
नाशिक : नाशिकमध्ये भोंदुगिरीचं दुकान चालवणाऱ्या आणि महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची अनेक प्रकरणं आता समोर येत आहे. महिलांच्या लैंगिक शोषण केल्याचे अनेक व्हिडीओ असल्याचं उघड झालं आहे. पण, भोंदूबाबा अशोक खरातचं काळं कृत्य एका ऑफिस बॉयने उघड केलं. नीरज जाधव असं या तरुणाचं नाव आहे. भोंदूबाबाचा सेवक असलेला नीरजने  बॉस खरातचे ५८ व्हिडीओ गुपचूप मिळवले आणि प्रकरणाला वाचा फोडली. विशेष म्हणजे, तो इथंच थांबला नाहीतर पैशासाठी त्याने काही महिलांना ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे.
महाराष्ट्राचं एफस्टिन फाईल्स म्हणून कॅप्टन अशोक खरातच्या प्रकरणावर विरोधक टीका करत आहे. मागील अनेक वर्षांपासून खरातने भोंदुगिरीचं दुकान मांडलं होतं. नाशिकमधील सिन्नरमध्ये त्याने आपल्या फॉर्म हाऊस, ऑफिसमध्ये अनेक महिला भाविकांचा छळ केल्याचा आरोप आहे. खरात यांचं नाशिकमधली शरणापूर रोडवर ओकस प्रॉपर्टी नावाचं ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये नीरज जाधव हा ऑफिस बॉय म्हणून कामाला लागला होता. नीरज हा नाशिक इथला रहिवासी आहे. कोरोनाच्या काळापासून तो अशोक खरात याच्याकडे काम करत होता.
advertisement
हाती लागले व्हिडीओ अन् नीरजची नियत फिरली
नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. ऑफिसमध्ये आपला बॉस खरात हा महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं त्याच्या नजरेस पडलं. त्यानंतर नीरजने एखाद्या सिनेमाला लाजवेल असा प्लॅन केला.  नीरजने खरातच्या नकळत ऑफिसमधील 58 सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवले. ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे हे काम त्याला सहज करता आलं.
advertisement
खरातकडे मागितले ५ कोटी
आता व्हिडीओ हातात लागल्यानंतर नीरज जाधवने आपल्याचं बॉस खरातला ब्लॅकमेल करण्याचा चंग बांधला. खरातकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे, हे नीरजलाा माहित होतं. त्यामुळे नीरजने खरातकडे 5 कोटींची मागणी केली होती. आपल्याकडे काही व्हिडीओ आहे, असं नीरजने खरातला बजावलं. पण, अशोक खरात हा इतक्या सहज ऐकणारा नव्हता.  अशोक खरातने नीरजला पैसे देण्यास नकार दिला होता.
advertisement
खरातने नकार दिल्यामुळे नीरजचा 'प्लॅन बी'
बॉस अशोक खरातने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे नीरजला वाटलं आपला प्लॅन फसला. त्यामुळे त्याने आपला मोर्चा पीडित महिलांकडे वळवला.  पुढे जाऊन पीडितांच्या मदतीनं पुन्हा ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करण्यात आला होता.  शिर्डीतील महिलेला मॉर्फ फोटो, व्हिडिओ खरातला पाठवले होते. एवढंच नाहीतर, नीरजने काही पीडित महिलांना फोटो, व्हिडीओ मार्फ करून ब्लॅकमेलिंगचा प्रकार केला. नीरज हा आपल्याला धमकावत असल्याची तक्रारच काही महिलांनी खरातकडे केली होती, अशीही माहिती समोर आली.
advertisement
पीडित महिलांची पोलिसांकडे तक्रार
त्यानंतर खरात याने पीडित महिलांना पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.  नीरजकडून आणखी एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.  'त्या' महिलेचा व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना पाठवला असल्याचं समोर आलं आहे.  त्यानंतर नाशिकमधील पीडितेनं पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात खरातचे व्हिडीओ समोर आले आणि त्याला अटक झाली.
advertisement
नीरज जाधव पोलिसांसमोर शरण
भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली . पण, त्यांचं हे काळ कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या तरुणाने खरात याचे व्हिडीओ बाहेर आणले होते. अखेरीस  कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला आहे.   नीरज जाधव याने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरण आला. त्यानंतर आता नाशिक क्राईम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Neeraj Jadav: 'अबतक 58' अशोक खरातचा करेक्ट कार्यक्रम करणारा नीरज जाधव कोण? 'बॉस'चा वाजवणार होता गेम! A to Z माहिती
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement