advertisement

अंगातील भूत काढण्यासाठी कारने श्रीवर्धनला नेलं, आईला बीचवर बसवून नराधमाचा मुलीवर अत्याचार

Last Updated:

Crime in Shriwardhan: रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं 'भूत काढण्याच्या' नावाखाली एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

News18
News18
श्रीवर्धन, रायगड: रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं 'भूत काढण्याच्या' नावाखाली एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईला आरोपीने मुलीच्या अंगातून 'भूत काढतो' असं खोटं सांगून विश्वासात घेतलं. या बहाण्याने त्याने पीडित मुलीसह तिच्या आईला आपल्या चारचाकी गाडीतून श्रीवर्धन येथे आणलं.
श्रीवर्धन येथे पोहोचल्यावर आरोपीने पीडितेच्या आईला समुद्रकिनारी थांबण्यास सांगितलं. आईला दूर केल्यानंतर, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला एकटं गाठलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली.
advertisement
या गंभीर घटनेची नोंद श्रीवर्धन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे या स्वतः करत आहेत. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अंगातून भूत काढण्याच्या नावाखाली नराधमाने अशाप्रकारे अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अंगातील भूत काढण्यासाठी कारने श्रीवर्धनला नेलं, आईला बीचवर बसवून नराधमाचा मुलीवर अत्याचार
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement