Voter ID Registration: विधानसभा निवडणुका तोंडावर, अजूनही नसेल Voter ID, तर आजच करा अर्ज, काम काही मिनिटांचं!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Voter ID Card Registration Process: आता मतदान कार्ड काढण्यासाठी पूर्वीप्रमाणे कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची किंवा मोठमोठ्या रांगेत उभं राहण्याची गरज नसते. हे काम घरबसल्या केवळ एका लिंकवर क्लिक करून होऊ शकतं.
नारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : काहीच महिन्यांपूर्वी देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या, तर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीये. त्यानिमित्तानं राजकीय पक्षांकडून बैठका, दौरे, भेटीगाठींचं सत्र सुरू आहे. आपल्या उमेदवाराला आमदार बनवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये. त्यामुळे आपणही आपला नेता निवडून द्यायला तयार राहायला हवं.
18 वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकानं आपला मतदानाचा अधिकार बजावायलाच हवा. एक भारतीय नागरिक म्हणून हे आपलं महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे. तुम्ही अजूनही मतदार ओळखपत्र अर्थात वोटर आयडी काढलं नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
advertisement
आता मतदान कार्ड काढण्यासाठी पूर्वीप्रमाणे कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची किंवा मोठमोठ्या रांगेत उभं राहण्याची गरज नसते. हे काम घरबसल्या केवळ एका लिंकवर क्लिक करून होऊ शकतं. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटद्वारे, काही सोप्या स्टेप्सद्वारे घरबसल्या आपण ते करू शकतो. त्यासाठीची पूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
- भारतीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India-ECI) वेबसाइटवर जा.
- मुखपृष्ठावर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर (National Voters Services Portal) क्लिक करा.
- आता ऑनलाइन अर्ज करा विभागात Registration of New Voter वर क्लिक करा.
- फॉर्म-6 डाऊनलोड केल्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
- भरलेल्या फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली सर्व माहिती एकदा तपासा आणि ती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
- यानंतर तुम्ही एंटर केलेल्या ई-मेल आयडीवर एक लिंक मिळेल.
- या लिंकद्वारे तुम्ही मतदार ओळखपत्र अर्जाची स्थिती सहजपणे ट्रॅक करू शकाल.
advertisement
ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते. केवळ फॉर्म लक्षपूर्वक निवडावा आणि कागदपत्र व्यवस्थित अपलोड करावे. अर्ज केल्यानंतर मतदार ओळखपत्र मिळण्यासाठी किमान 1 आठवडा आणि कमाल 1 महिना लागू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2024 12:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Voter ID Registration: विधानसभा निवडणुका तोंडावर, अजूनही नसेल Voter ID, तर आजच करा अर्ज, काम काही मिनिटांचं!


