Intelligent Kid: मूर्ती लहान पण किर्ती महान! 26 महिन्यांच्या अथांगची 'वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद, कामगिरी काय?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Intelligent Kid: काही मुलं बालपणादेखील आपल्या बुद्धीने भल्याभल्यांना आश्चर्य व्यक्त करण्यास भाग पाडतात.
छत्रपती संभाजीनगर: बालपण सर्वांना प्रिय असतं. कारण, या वयात व्यक्तीला कसलीही चिंता नसते. सर्वांकडून लाड करून घेणे आणि मनसोक्त बागडे, हीच लहान मुलांची दिनचर्या असते. मात्र, काही मुलं याला अपवाद असतात. बालपणादेखील ते आपल्या बुद्धीने भल्याभल्यांना आश्चर्य व्यक्त करण्यास भाग पाडतात. छत्रपती संभाजीनगरमधील 26 महिन्यांचा अथांग अपार हा देखील असाच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मुलगा आहे. अथांगने आपली बुद्धी, स्मरणशक्ती आणि कर्तृत्वाच्या जोरावर 'वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'पर्यंत मजल मारली आहे.
अथांग हा छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉ. दिपक अपार आणि डॉ. रिद्धी अपार यांचा मुलगा आहे. त्याने 13 मिनिटे 50 सेकंदामध्ये 150 फ्लॅश कार्ड ओळखले आहेत. त्याने शास्त्रज्ञ व त्यांचे शोध, जगातील सर्व देशांचे ध्वज, भारतातील नामवंत व्यक्तिमत्त्व अचूकपणे ओळखले. त्यामुळे त्याच्या नावाची नोंद 'वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये झाली आहे.
advertisement
अथांगची आई डॉ. रिद्धी अपार म्हणाल्या, "अथांग दीड महिन्याचा होता तेव्हापासून त्याला मी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅश कार्ड दाखवते. सात-आठ महिन्यांचा झाल्यानंतर तो फ्लॅश कार्ड ओळखू लागला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की, याची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. तेव्हापासून आम्ही त्याला अगदी हसत खेळत फ्लॅश कार्ड आणि इतर गोष्टी शिकवू लागलो. आम्ही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बर्डन टाकलं नाही."
advertisement
अथांगचे वडील डॉ. दीपर अपार म्हणाले, "त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळी माहिती जाणून घ्यावी. ही माहिती आणि आपल्या बुद्धीच्या आधारे त्याने एखादा वर्ल्ड रेकॉर्ड करावा, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 08, 2025 12:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Intelligent Kid: मूर्ती लहान पण किर्ती महान! 26 महिन्यांच्या अथांगची 'वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद, कामगिरी काय?