advertisement

IND vs ENG : पाकिस्तानला जमलं रे... पण टीम इंडियाला नाही, टी-20 वर्ल्ड कपमधली सर्वात मोठी चूक अन् बुडणार वर्ल्ड कप!

Last Updated:

India Most dropped 13 catches in World Cup : टीम इंडियाची एक चूक कुणाच्याच लक्षात आली नाही. 2024 चा वर्ल्ड कप ज्याच्या जोरावर जिंकला तोच फॉर्म्युला टीम इंडिया विसरल्याचं पहायला मिळतंय.

India dropped 13 catches in T20 World Cup 2026 the most by team
India dropped 13 catches in T20 World Cup 2026 the most by team
India Most dropped 13 catches in World Cup : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाचं नाव समोर येतं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत धडक मारलीये. टीम इंडियाच्या बॅटिंगने सर्वांना चकित केलंय. तर टीम इंडियाची बॉलिंग सर्वांचा घाम फोडतीये. अशातच आता टीम इंडियाची एक चूक कुणाच्याच लक्षात आली नाही. 2024 चा वर्ल्ड कप ज्याच्या जोरावर जिंकला तोच फॉर्म्युला टीम इंडिया विसरल्याचं पहायला मिळतंय.

तब्बल 13 कॅच सोडले

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने सेमीफायनल गाठली असली, तरी मैदानावर टीम इंडियाची फिल्डिंग मात्र अतिशय चिंतेची बाब ठरली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत तब्बल 13 कॅच सोडले असून, कोणत्याही संघाकडून झालेले हे सर्वाधिक ड्रॉप कॅच आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सुपर 8 मॅचमध्येही भारतीय फिल्डर्सनी 3 महत्त्वाचे कॅच सोडले, ज्याचा फटका टीमला बसू शकला असता.
advertisement

टीम इंडियाची फिल्डिंग चिंतेचा विषय

आकडेवारीवर नजर टाकल्यास, भारताची कॅचिंग इफिशियन्सी अवघी 71.7% इतकी आहे, जी सुपर 8 मध्ये पोहोचलेल्या सर्व संघांमध्ये सर्वात निचांकी आहे. याचाच अर्थ, भारतीय खेळाडू प्रत्येक 10 कॅचपैकी साधारण 3 संधी गमावत आहेत. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये तर भारतीय खेळाडूंनी 4 वेळा बॉल हातातून निसटू दिला होता, ज्यामुळे फिल्डिंग कोचवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
advertisement

पाकिस्तानची फिल्डिंग टीम इंडियापेक्षा चांगली

यंदाच्या वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर पडली आहे. पाकिस्तानची फिल्डिंग जगात जोकचा मुद्दा असला तरी यंदा पाकिस्तानने चांगली कामगिरी केली होती. पाकिस्तानने 83.3% ची पकडण्याची टक्केवारी होती. ही कामगिरी भारताच्या तुलनेत खूप चांगली आहे. पाकिस्तानने फक्त 5 कॅच सोडले होते. अशातच टीम इंडियाला कामगिरी सुधारावी लागणार आहे.
advertisement

इंग्लंडचं पारडं भारी

दरम्यान, दुसरीकडे, भारताचा सेमीफायनलमधील प्रतिस्पर्धी इंग्लंड हा संघ या स्पर्धेत सर्वात 'क्लिनिकल' फिल्डिंग साईड ठरली असून इंग्लंडची कॅचिंग इफिशियन्सी तब्बल 93.2% इतकी असून त्यांनी स्पर्धेत केवळ 3 कॅच सोडले आहेत. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध जर भारतीय फिल्डर्सनी कॅच सोडले तर त्यांच्या हातून मॅच निसटायला वेळ लागणार नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 2024 मध्ये सूर्यकुमारचा एक लॉग ऑफचा कॅच गेमचेंजर ठरला होता. आता याचाच विसर टीम इंडियाला पडलाय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : पाकिस्तानला जमलं रे... पण टीम इंडियाला नाही, टी-20 वर्ल्ड कपमधली सर्वात मोठी चूक अन् बुडणार वर्ल्ड कप!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement