Chhatrapati Sambhajinagar News : तीन वर्षाच्या चिमुकल्याची खास वस्तू हरवली, 68 CCTV तपासले, छ. संभाजीनगर पोलिसांनी ती रिक्षा शोधली अन्....
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरी समोर आलेली आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्याची हरवलेली खास वस्तू शोधण्यासाठी पोलिसांनी 68 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. अथक प्रयत्नानंतर त्यांनी ती रिक्षा शोधून काढली.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांच्या तत्परतेचा आणि संवेदनशीलतेचा आदर्श दाखवणारी घटना समोर आली आहे. एका कामगार महिलेची सहा लाख रुपयांची हिअरिंग एड मशीन, 21 हजारांचा मोबाइल आणि रोख रक्कम अशी मौल्यवान वस्तू असलेली बॅग रिक्षात विसरली गेली होती. पण पोलिसांच्या झटपट कारवाईमुळे ती बॅग काही तासांतच सुखरूप परत मिळाली.
अकोल्यातील जामगावच्या प्रिया विक्रांत वानखेडे (वय 24) पतीच्या नोकरीनिमित्त कुटुंबासह बजाजनगरमध्ये वास्तव्यास असतात. ते एका कंपनीत नोकरीला आहेत. त्यांच्या 3 वर्षांच्या मुलाच्या कानावर उपचार सुरू आहेत. समर्थनगर येथील डॉक्टरांकडे स्पीच थेरपी सुरू असून प्रिया नियमित मुलासह रुग्णालयात ये-जा करत असतात.
त्यांना योजनेतून मुलासाठी जवळपास 6 लाख रुपये किंमत असलेले ऑस्ट्रेलियन बनावटीचे श्रवणयंत्र मिळाले होते. दि. 18 रोजी दुपारी प्रिया मुलासह स्पीच थेरपीसाठी समर्थनगरला गेल्या. यावेळी यंत्र रिक्षातच विसरल्या. घाबरलेल्या वानखेडे दाम्पत्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या व्हॉट्सअॅपवर मदत मागितली. आयुक्तांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांना दाम्पत्याला सर्वोतोपरी मदत करण्याची सूचना केली
advertisement
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त पवार यांनी त्वरित आदेश दिले. गुन्हे शाखेच्या अधिकारी शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधील तब्बल 68 सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित रिक्षा शोधून काढली. ए. एस. क्लब जवळील एका कॅमेऱ्यात रिक्षाचा क्रमांक कैद होताच त्यांनी बाबा चौक ते रेल्वेस्थानक परिसरात त्याचा शोध घेतला. चोवीस तासांत चालक मिळून आल्यानंतर रिक्षातील वानखेडे यांची पर्स देखील मिळून आली. श्रवणयंत्र मिळाल्याचा आनंद अश्रूमधून व्यक्त करत वानखेडे दाम्पत्याने पोलिसांचे कृतज्ञतेने आभार मानले.
advertisement
आर्थिक अडचणीत असलेल्या आईचा मुलासाठी लागणारा महत्त्वाचा यंत्र परत मिळवून देताना पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि काळजी खरोखर कौतुकास्पद आहे. या घटनेतून पोलिस नागरिकांच्या मदतीसाठी किती लवकर आणि मनापासून काम करतात, हे स्पष्ट दिसून आले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 1:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar News : तीन वर्षाच्या चिमुकल्याची खास वस्तू हरवली, 68 CCTV तपासले, छ. संभाजीनगर पोलिसांनी ती रिक्षा शोधली अन्....