Chhatrapati Sambhaji Nagar : ई-दुचाकी वापरताना सावध! बॅटरी चार्जिंगदरम्यान महिलेसोबत भयानक घडलं; संभाजीनगर हादरलं
- Published by:Tanvi
 - local18
 - Reported by:Apurva Pradip Talnikar
 
Last Updated:
EV battery Fire Incidents Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगदरम्यान बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात वृद्ध महिला गंभीर भाजल्या असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर : सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराबरोबरच त्यांच्याशी संबंधित अपघातांच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अशाच एका घटनेत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा भीषण स्फोट होऊन एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील आडूळ गावातील बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी घडली.
जखमी महिलेचं नाव मुक्ताबाई सर्जेराव पिवळ (वय 74, रा. आडूळ) असं असून, त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम उत्तमराव पिवळ यांच्या मालकीचं बॅटरी दुरुस्ती आणि विक्रीचं दुकान आडूळ बसस्थानकाजवळ आहे. सोमवारी दुपारी त्यांनी एका इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी दुकानात चार्जिंगला लावली होती. काही वेळाने बॅटरीचा अचानक स्फोट झाला. त्या वेळी दुकानात मुक्ताबाई पिवळ बसलेल्या असल्याने त्या स्फोटात गंभीररित्या भाजल्या.
advertisement
स्फोटाचा आवाज मोठ्या अंतरावर ऐकू गेल्याने ग्रामस्थांनी तातडीने मदत केली आणि जखमींना रुग्णालयात हलवले. सुदैवाने स्फोटाच्या वेळी दुकानात इतर ग्राहक नसल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणाची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhaji Nagar : ई-दुचाकी वापरताना सावध! बॅटरी चार्जिंगदरम्यान महिलेसोबत भयानक घडलं; संभाजीनगर हादरलं


