ट्रेन मिळाली नाही विमानाने जा! संभाजीनगर-हैदराबाद प्रवास होणार सुखद, आठवड्यातून इतके दिवस करता येणार विमान प्रवास
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Daily Flights Chhatrapati Sambhajinagar TO Hyderabad : छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादसाठी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिगो एअरलाइन्सने 25 ऑक्टोबरपर्यंत रोज विमानसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातून हैदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी इंडिगो एअरलाईन्सने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आठवड्यातून केवळ तीन दिवसच सकाळच्या वेळेत उड्डाणाची सुविधा उपलब्ध होती. मात्र, वाढती प्रवासी संख्या आणि व्यवसायिक मागणी लक्षात घेऊन आता 25 ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवास करणाऱ्यांना अधिक लवचिकता आणि सोय मिळणार आहे.
सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून प्रवाशांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. त्यामुळे इंडिगोने मर्यादित दिवसांऐवजी दररोज उड्डाण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी, विद्यार्थी, वैद्यकीय कारणांसाठी तसेच नोकरीसाठी प्रवास करणाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल.
दरम्यान 26 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकानुसार पुन्हा आठवड्यातून तीन दिवसच सकाळी हैदराबाद उड्डाण राहील. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा कायमस्वरूपी दररोज सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती कोठारी यांनी दिली. तज्ज्ञांच्या मते, या उपक्रमामुळे दोन्ही शहरांतील व्यावसायिक आणि पर्यटन व्यवहारांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
ट्रेन मिळाली नाही विमानाने जा! संभाजीनगर-हैदराबाद प्रवास होणार सुखद, आठवड्यातून इतके दिवस करता येणार विमान प्रवास